Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पुण्यापेक्षा जळगावमध्ये लिंबूचे दर वधारले, एक लिंबू किती रुपयांना मिळतोय, वाचा सविस्तर 

पुण्यापेक्षा जळगावमध्ये लिंबूचे दर वधारले, एक लिंबू किती रुपयांना मिळतोय, वाचा सविस्तर 

Latesit news Lemon prices have increased in Jalgaon compared to Pune, how much does lemon cost, read in detail | पुण्यापेक्षा जळगावमध्ये लिंबूचे दर वधारले, एक लिंबू किती रुपयांना मिळतोय, वाचा सविस्तर 

पुण्यापेक्षा जळगावमध्ये लिंबूचे दर वधारले, एक लिंबू किती रुपयांना मिळतोय, वाचा सविस्तर 

Lemon Market : एकीकडे राज्यात उष्णतेचा पारा चढत असताना, सर्वत्र लिंबू सरबताला मागणी वाढली आहे.

Lemon Market : एकीकडे राज्यात उष्णतेचा पारा चढत असताना, सर्वत्र लिंबू सरबताला मागणी वाढली आहे.

सोलापूर : मागील काही दिवसात राज्यात झालेली अवकाळी तसेच हवामानाच्या लहरीपणामुळे भाजीपाल्याचे उत्पादन सर्वत्र घटत चालले आहे. याचा फटका लिंबूच्या पिकाला देखील बसला आहे. एकीकडे राज्यात उष्णतेचा पारा चढत असताना, सर्वत्र लिंबू सरबताला मागणी वाढली आहे.

मात्र उत्पादन कमी झाल्याने मार्केटमध्ये त्याची आवक घटली आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र एका लिंबूसाठी चक्क दहा रुपये मोजावे लागत आहे. छोटे लिंबूही १० रुपयांना विकले जात असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

वाचा आजचे बाजारभाव 
पुणे मार्केटमध्ये लोकल लिंबूला कमीत कमी ४०० रुपये, सरासरी १४०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये कमीत कमी ९ हजार रुपये तर सरासरी ११ हजार रुपये, मुंबई मार्केटमध्ये सरासरी ०५ हजार रुपये दर मिळाला. 

धाराशिव मार्केटमध्ये कागदी लिंबाला कमीत कमी ०५ हजार रुपये तर सरासरी ९ हजार रुपये, सोलापूर मार्केट मध्ये लोकल लिंबाला कमीत कमी १५०० रुपये, तरी सरासरी ०८ हजार रुपये, नाशिक मार्केटमध्ये हायब्रीड लिंबाला सरासरी ०७ हजार रुपये तर कल्याण मार्केटमध्ये ११ हजार रुपये दर मिळाला. 

अकलूज मार्केटमध्ये सरासरी ०६ हजार रुपये, कोल्हापूर मार्केटमध्ये ९ हजार ५०० रुपये, जळगाव मार्केटमध्ये १२ हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये १० हजार ५०० रुपये असा दर मिळाला. 
 

Web Title: Latesit news Lemon prices have increased in Jalgaon compared to Pune, how much does lemon cost, read in detail