Join us

Lasalgaon Market : लासलगाव बाजार समितीत कांद्यासह भुसार मालाचा लिलाव आज राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 11:09 IST

लासलगाव (जि. नाशिक) कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सोमवार (दि.०७) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांच्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

लासलगाव (जि. नाशिक) कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सोमवार (दि.०७) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांच्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात, सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना सूचित करण्यात आले आहे की, सोमवारी लासलगाव मुख्य बाजार, निफाड व विंचूर उपबाजार आवारातील तसेच मानोरी खुर्द येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा, भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव बंद राहतील.

सध्या अनेक शेतकरी उन्हाळ कांद्यासह मूग, भुईमूग, सोयाबीन, उडीद, आदी भुसार बाजारात विक्री करिता घेऊन येत आहे. मात्र बाजार समितीने पुकारलेल्या या संपामुळे कांदा विक्रीवर व भुसार उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. 

तथापि, आज लासलगाव मुख्य बाजार, निफाड व विंचुर उपबाजार, मानोरी खुर्द येथील टोमॅटो व भाजीपाला यांचा लिलाव सामान्यपणे चालू राहणार आहे.

हेही वाचा -Poultry Success Story : अंडी विक्री व्यवसायाला पोल्ट्रीची साथ; भिकाभाऊंची आयुष्याच्या अडचणींवर दमदार मात

टॅग्स :नाशिकनिफाडपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरीभाज्याकांदामार्केट यार्ड