Lokmat Agro >शेतशिवार > Kashmiri Apple Farming : मराठवाड्यातील खडकाळ माळरानावर गजाननरावांनी फुलविली सफरचंदाची बाग वाचा सविस्तर

Kashmiri Apple Farming : मराठवाड्यातील खडकाळ माळरानावर गजाननरावांनी फुलविली सफरचंदाची बाग वाचा सविस्तर

Kashmiri Apple Farming: latest news Palmate has created an apple orchard on the rocky Malrana plains of Marathwada. | Kashmiri Apple Farming : मराठवाड्यातील खडकाळ माळरानावर गजाननरावांनी फुलविली सफरचंदाची बाग वाचा सविस्तर

Kashmiri Apple Farming : मराठवाड्यातील खडकाळ माळरानावर गजाननरावांनी फुलविली सफरचंदाची बाग वाचा सविस्तर

Kashmiri Apple Farming : मराठवाड्यात सफरचंद शेती (Apple Farming) करणे मोठे कठीण काम आहे. उष्ण हवामान आणि दुष्काळाचा सामना करावा लागणारा प्रदेश म्हणून ओळखले जाते. परंतु, कोपरा येथील शेतकरी गजानन मल्लिकार्जुन पलमटे यांनी सफरचंदाची बाग फुलविली. (Kashmiri Apple Farming)

Kashmiri Apple Farming : मराठवाड्यात सफरचंद शेती (Apple Farming) करणे मोठे कठीण काम आहे. उष्ण हवामान आणि दुष्काळाचा सामना करावा लागणारा प्रदेश म्हणून ओळखले जाते. परंतु, कोपरा येथील शेतकरी गजानन मल्लिकार्जुन पलमटे यांनी सफरचंदाची बाग फुलविली. (Kashmiri Apple Farming)

शेअर :

Join us
Join usNext

संजीवकुमार देवनाळे

मराठवाड्यात सफरचंद शेती (Apple Farming) करणे मोठे कठीण काम आहे. उष्ण हवामान आणि दुष्काळाचा सामना करावा लागणारा प्रदेश म्हणून ओळखले जाते. परंतु, कोपरा येथील शेतकरी गजानन मल्लिकार्जुन पलमटे यांनी सफरचंदाची बाग फुलविली. (Kashmiri Apple Farming)

सफरचंद शब्द उच्चारला की, आपणास काश्मीर, हिमाचल प्रदेशाची आठवण होते. मात्र, कमी पर्जन्यमानाच्या मराठवाड्यातही सफरचंदाचे उत्पादन घेता येते, हे कोपरा येथील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. (Kashmiri Apple Farming)

एक एकर माळरानावर सफरचंद बाग फुलवली असून सध्या फळे लागत आहेत. सफरचंदाचे उत्पन्न हे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात होते. येथील सफरचंदाला नेहमी मागणी असते. त्यामुळे शेतकरी गजानन मल्लिकार्जुन पलमटे यांनी सफरचंद लागवडीचे ठरविले.

दीड वर्षापूर्वी लागवड...

* शिर्डी येथील श्रीरामपूरहून त्यांनी दीड वर्षांपूर्वी ४५० सफरचंदाची रोपे आणली. एक रोप १५० रुपयांना मिळाले. खड्यात काळी माती आणि शेणखत टाकून योग्य पद्धतीने लागवड केली आणि त्याची जोपासना केली. त्यासाठी त्यांना साधारणतः अडीच लाख रुपये खर्च आला.

* दीड वर्षानंतर सफरचंदाच्या झाडांना फळधारणेला सुरुवात झाली आहे. फुले आणि फळांनी झाडे लगडली आहेत.

* लागवडीचा खर्च व मजुरी वजा करता एक लाख रुपये नफा मिळणे अपेक्षित आहे.

* एक एकर पडिक जमिनीवर दोन बाय दोन आकाराचे खड्डे घेऊन रोपांची लागवड केली आहे.

३८ अंश सेल्सिअस तापमानातही फळधारणा...

दररोज एक सफरचंद खा आणि आरोग्य सांभाळा, असे म्हटले जाते. विशेषतः ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानात सफरचंदाच्या झाडांना फळधारणा होत आहे. ही फळे उत्तम व चविष्ट आहेत.

झाडे जसजशी वाढतील, तसतसा खर्च कमी होऊन उत्पन्न अधिक वाढते, असे पलमटे यांनी सांगितले.

सफरचंदाची झाडे फुले आणि फळांनी बहरली...

माळरानावर खड्डे खोदून काळी माती व शेणखत टाकून रोपांची लागवड केली. अडीच लाख रुपयांचा खर्च आला. सध्याला सफरचंदाची झाडे फुलांनी आणि फळांनी बहरली आहेत. खर्च वजा करता एक लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. - गजानन पलमटे, शेतकरी.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story: पिवळ्या नव्हे काळ्या हळदीचा घोडेकर यांचा यशस्वी प्रयोग वाचा सविस्तर

Web Title: Kashmiri Apple Farming: latest news Palmate has created an apple orchard on the rocky Malrana plains of Marathwada.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.