Lokmat Agro >शेतशिवार > Kaju Udyog : 'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची काजू प्रक्रिया उद्योगात निवड

Kaju Udyog : 'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची काजू प्रक्रिया उद्योगात निवड

Kaju Udyog : Sindhudurg selected for 'One District One Product' award in cashew processing industry | Kaju Udyog : 'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची काजू प्रक्रिया उद्योगात निवड

Kaju Udyog : 'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची काजू प्रक्रिया उद्योगात निवड

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडिया तर्फ केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' ODOP पुरस्कारासाठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश झाला आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडिया तर्फ केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' ODOP पुरस्कारासाठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडिया तर्फ केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाला नामांकन मिळाले आहे.

देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश झाला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे.

केंद्रीय वाणिज्य अणि उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक व्यवस्थापक ताशी दोरजी शेर्पा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पडताळणी बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संगणकीय सादरीकरण केले. त्यावेळी काजू आणि काजू उत्पादनाबाबत व काजू प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.

'वेंगुर्ला काजू' यांस सन २०१८ मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १२,००० हेक्टर क्षेत्रामध्ये काजू लागवड झालेली आहे. देशामध्ये काजू प्रकियामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे, असेही पाटील म्हणाले.

वेंगुर्ला, मालवण तालुका क्लस्टरची निर्मिती
- जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविला जात असून शेजारील जिल्हे तसेच केरळ, तामिळनाडू राज्यातील उद्योजक, शासकीय संस्था यांची मदत घेतली जात आहे.
उद्योजकांना याबाबत वेळोवेळी संपूर्ण प्रश्नावली व उत्तरांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला तालुका क्लस्टर तसेच मालवण तालुका क्लस्टर यांनी त्यांचे क्लस्टरबाबत माहिती दिली.

जिल्हा काजू उद्योगात अग्रेसर
▪️याबाबत में रुक्मीणी १ फूडस, हुमरस या उद्योग घटकास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी काजू उत्पादन प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी जिल्हा काजू उत्पादन व प्रक्रिया उद्योगात अग्रेसर झाला असून 'वेंगुर्ला कॅश्यु' हा एक ब्रँड झाला आहे, असे श्री. शेर्पा म्हणाले.
▪️यावेळी कोकण २ विभागाचे उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना संगणकीय सादरीकरणव्दारे दाखविण्यात आले. या मध्ये, जिल्हा उद्योग केंद्र येथे उभारण्यात आले आहे.

अधिक वाचा: समुद्रात अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्या मच्छीमारी नौकांपर्यंत पोहोचण्यासाठी इस्रोकडून नवीन यंत्रणा विकसित

Web Title: Kaju Udyog : Sindhudurg selected for 'One District One Product' award in cashew processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.