Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ

Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ

Kaju Beej Anudan Yojana : Extension of Government for Raw Cashew Subsidy Scheme | Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ

Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ

शासनाने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे.

शासनाने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे.

रत्नागिरी : शासनाने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.

काजू बी शासन अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अनुदान मागणीसाठी कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज.
२) संमतीपत्र.
३) ७/१२.
४) कृषी खात्याचा दाखला.
५) जी. एस. टी. बिल.
६) बँक तपशील.
७) आधारकार्ड.
८) हमीपत्र इत्यादी कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी इच्छुक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागीय कार्यालय, शांतीनगर, नाचणे येथे संपर्क साधावा अथवा कृषी व्यवसाय पणन तज्ज्ञ पवन बेर्डे, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Kaju Beej Anudan Yojana : Extension of Government for Raw Cashew Subsidy Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.