सोलापूर : सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे.
आता हे अभियान ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार असल्याचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस प्रोत्साहित करणे हा याचा उद्देश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्याकरिता व उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.
मात्र, दरम्यानच्या काळात उद्भवलेली पूरस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे या अभियानाच्या अंमलबजावणीवर मर्यादा आल्या.
त्यामुळे ग्रामपंचायतींना या अभियानात प्रभावी सहभागाची संधी मिळावी, अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची पूर्तता करता यावी यामुळे शासनाने अभियानाचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा: ई-केवायसी व खाते मिसमॅचचा घोळ; शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसानभरपाईचे २७७ कोटी अडकले
