Lokmat Agro >शेतशिवार > औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे अन् पैशाची बचत करायचीय मग वापरा हे तंत्र

औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे अन् पैशाची बचत करायचीय मग वापरा हे तंत्र

If you have a problem with labor for spraying pesticides and want to save money, then use this technique. | औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे अन् पैशाची बचत करायचीय मग वापरा हे तंत्र

औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे अन् पैशाची बचत करायचीय मग वापरा हे तंत्र

मजुरांची टंचाई व मजुरीचे दिवसेंदिवस वाढते दर यामुळे शेती करणे अवघड बनत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

मजुरांची टंचाई व मजुरीचे दिवसेंदिवस वाढते दर यामुळे शेती करणे अवघड बनत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

संतोष भोसले
किणी: मजुरांची टंचाई व मजुरीचे दिवसेंदिवस वाढते दर यामुळे शेती करणे अवघड बनत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

नव्याने विकसित झालेल्या ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी करू लागल्याने वेळेची व पैशाची बचत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ड्रोन वापरण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे.

वारणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठची जवळपास सर्वच शेती बागायती आहे. शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उसासह गहू, हरभरा, भात, भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला फूलशेती, फळबाग लागवडीची शेती करत असतात.

मात्र गेले काही दिवस मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. यावर मात करत नव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित करण्यात आलेल्या ड्रोनच्या साहाय्याने पिकांवर औषध फवारणी करू लागल्याचे चित्र आहे.

सहाशे रुपयांत केवळ अर्ध्या तासात एक एकराची औषध फवारणी करून होवू लागल्याने कमीत कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीत जास्त क्षेत्रावर औषध फवारणी होत आहे.

विशेषतः मोठ्या उसावर ड्रोनची औषध फवारणी चांगल्या प्रकारे होत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. विविध सहकारी संस्था व व्यक्तिगत ड्रोन भाडेतत्त्वावर बांधावर उपलब्ध होत असून, दिवसभरात एका ड्रोनने पंधरा ते वीस एकर क्षेत्रावर औषध फवारणी होते.

सेवा संस्था, पाच ते दहा शेतकरी यांनी एकत्र येऊन ड्रोन खरेदी केल्यास औषध मारणे सोपे होणार असून हे ड्रोन भाड्यानेही देता येणार आहे. याचा लाभ घेण्याची गरज आहे.

शासनाचे अनुदान
सहा ते नऊ लाख रुपये किंमत एका ड्रोनची आहे. ५० ड्रोन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत कार्यरत आहेत. यासाठी शासनाकडून ४० टक्के अनुदानही दिले जाते. तर कृषी पदवीधर असले तर त्याला ५० टक्के अनुदान मिळते. ड्रोनला दहा लिटर औषधाचा पंप आहे. त्यातून एक एकर क्षेत्र पूर्ण होते.

फवारणीचा दर कसा?
६०० रुपयांत एक एकरातील औषध फवारणी करून मिळू लागल्याने कमीत कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीत जास्त क्षेत्रावर औषध फवारणी होत आहे. केवळ अर्ध्या तासात एका एकरातील औषध फवारणी पूर्ण होते.

ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी केल्याने वेळेची बचत होऊन फवारणी चांगल्या दर्जाची होते; त्यामुळे शेतकरी अधिक पसंती देत आहेत. - वैभव कुंभार, शेतकरी, किणी

अधिक वाचा: बनावट दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदणी कायदा बदलणार; काय होणार बदल? वाचा सविस्तर

Web Title: If you have a problem with labor for spraying pesticides and want to save money, then use this technique.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.