राज्यात दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे.
तसेच दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे.
राज्यामध्ये एकूण १.७१ कोटी खातेदार संख्या असून यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत.
ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी.
नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा (बियाणे, खते, औषधे इ.) प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींना आवाहन करण्यात येते की, ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा.
फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास खालील हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.
| अ.क्र. | विभाग | सहाय्यक कृषी अधिकारी | मोबाईल नंबर |
|---|---|---|---|
| १ | अमरावती | श्री. अजितकुमार गेजगे | 9657109809 |
| २ | पुणे | श्रीम. संगीता ननावरे | 7588509492 |
| ३ | कोकण | श्रीम. सोनाली वाडेकर | 9404953518 |
| ४ | छ. संभाजीनगर | श्रीम. शीतल कौदरे | 9172319637 |
| ५ | नागपूर | श्री. अजितकुमार गेजगे | 9657109809 |
| ६ | नाशिक | श्रीम. सोनाली वाडेकर | 9404953518 |
अधिक वाचा: आता दुपारची लाईट जाणे होणार बंद; महावितरणच्या मुख्यालयाकडून आले 'हे' नवे निर्देश
