Lokmat Agro >शेतशिवार > माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?

माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?

How did Malegaon Sugar Factory pay sugarcane prices in the last 10 years? In which year did the prices go up the most? | माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?

माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?

माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार अशी घोषणा करण्यात आली होती.

शेअर :

Join us
Join usNext

माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार अशी घोषणा करण्यात आली होती.

नुकतीच माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक झाली यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकत नेतृत्वाचा करिश्मा सिद्ध केला.

गुरु-शिष्यांच्या सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले.

गाळप हंगाम २०२४-२५ म्हणजे यंदाचा अंतिम ऊस दर देणे अजून बाकी आहे. निवडणुक झाली आता दर अजून वाढवून मिळणार का? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

मागील १० वर्षात माळेगाव कारखान्याने उसाला दिलेला दर

हंगामदर (रु.)
२०१५-१६२,८००
२०१६-१७३,१००
२०१७-१८२,९००
२०१८-१९३,४००
२०१९-२०२,७५०
२०२०-२१२,७५०
२०२१-२२३,१००
२०२२-२३३,४११
२०२३-२४३,६३६
२०२४-२५३,३३२ (अंतिम दर देणे बाकी)

अधिक वाचा: Pik Vima Hapta : यंदा पीकविमा हप्त्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे; वाचा सविस्तर

Web Title: How did Malegaon Sugar Factory pay sugarcane prices in the last 10 years? In which year did the prices go up the most?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.