Helthy Papai : पपई हे फळ केवळ चविष्टच नाही तर विविध जीवनसत्त्वे, पोषक घटक आणि औषधी गुणधर्मानी परिपूर्ण आहे. निसर्गाने दिलेले हे बहुगुणी फळ मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.
पपईचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनसंस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम. पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाइम असते, जे अन्नाचे पचन सुलभ करते. त्यामुळे अपचन, गॅस, आम्लपित्त यासारखे पोटाचे विकार सहजपणे दूर होतात. नियमित पपईचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कायमस्वरूपी कमी होतो, कारण त्यातील नैसर्गिक फायबर आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवते. पपई रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.
पपईमध्ये जीवनसत्त्व अ, क, ई तसेच बी-कॉम्प्लेक्स मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांचे संतुलित मिश्रण पपईमध्ये आहे, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते.
त्वचेसाठी पपई अत्यंत लाभदायक असून, ती त्वचा स्वच्छ, तजेलदार व तेजस्वी ठेवते. वजन नियंत्रणासाठीही पपई उपयुक्त आहे. कारण ती कमी कॅलरीची असून, पोट भरल्याची भावना देते. एकूणच, पपई म्हणजे जीवनसत्त्वे, पोषण आणि ऊर्जेचे सर्वांगसुंदर मिश्रण आहे. पोटाचे विकार छूमंतर करणारे आणि शरीराला निरोगी ठेवणारे हे फळ दैनंदिन आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
सहज कुठेही उपलब्ध आणि स्वस्त असलेल्या या नैसर्गिक औषधाचं उपयोगी स्वरूप हे बाजारातील महागड्या आणि कधी कधी साइड इफेक्ट्स देणाऱ्या मेडिकल औषधांपेक्षा कधीही अधिक फायदेशीर आहे. नैसर्गिक पपईचे सेवन शरीराला कोणतेही दुष्परिणाम न देता दीर्घकालीन आरोग्य लाभ देते. त्यामुळे दैनंदिन आहारात पपईचा समावेश करणे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
