राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कांदाचाळ उभारणी प्रकल्पास एकूण रु. ५१००.०० लाख अनुदान मर्यादेत सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पातील अखर्चित रक्कम रु.३६१५.०० लाख रकमेच्या मर्यादेत सन २०२५-२६ मध्ये राबविण्यास राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या ४० व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीच्या बैठकीमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे.
सदर मान्यतेस अनुसरून सन २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कांदाचाळ उभारणी या प्रकल्पाची उर्वरित रु. ३६१५.०० लाख रकमेच्या मर्यादेत अंमलबजावणी करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सन २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 'कांदाचाळ उभारणी प्रकल्प' उर्वरित रु. ३६१५.०० लाख रकमेच्या मर्यादेत राबविण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकासाच्या अभियानाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कांदाचाळ घटकाच्या रु. ४०००/- मे टन अनुदान या सुधारित मापदंडानुसार उर्वरित रू. ३६१५.०० लाख निधीचा कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अधिक वाचा: गावरान कांद्याच्या स्पर्धेत लाल कांदा टिकणार का? बाजारात काय परिस्थिती? वाचा सविस्तर
