lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन

सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन

golden opportunity; Franchise Post and earn up to 25 percent commission | सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन

सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन

पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे.

पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे. भारतीय पोस्ट खाते हे जगातील सर्वांत मोठे नेटवर्क मानले जाते.

भारतात काही लाखांमध्ये पोस्टाचे कार्यालये आहेत. यातील ८९ टक्के पोस्टाचे खाते हे ग्रामीण भागात आहेत. एवढी पोस्ट खात्याची संख्या असूनही अद्यापही बऱ्याच ठिकाणी पोस्टाची सुविधा पोहोचलेली नाही. त्याला पर्याय म्हणून फ्रेंचायझी योजना आणण्यात आली आहे. तेथे गुंतवणूक करणे तरुणांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

फ्रेंचायझी कशी मिळवाल?
अर्जदाराने प्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज डाऊनलोड करावा. जवळच्या कार्यालयातूनही तो उपलब्ध आहे. त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी आणि कार्यालयात जमा करावी. संबंधित अधिकारी अवघ्या १४ दिवसांत पात्र अर्जदाराला फ्रँचायझी देतील. त्यासाठी दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आहे.

या गोष्टींची विक्री करता येईल
• स्टॅम्प आणि स्टेशनरी
• ई गव्हर्न्स प्रकल्प
• रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट
• बिल, कर वसुली, पेमेंट सेवा
• पोस्टल लाइफ इन्शुरन्स

Web Title: golden opportunity; Franchise Post and earn up to 25 percent commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.