गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात १ ते १५ डिसेंबरअखेर गळितास आलेल्या उसाची बिले संबंधित ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी दिली.
महिंद म्हणाले, १ ते १५ डिसेंबरअखेर ३६१२६.८५३ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. त्याचे प्रतिटन ३४०० रुपयेप्रमाणे होणारी एकरकमी १२ कोटी २८ लाख ३१ हजार ३०० इतकी रक्कम विनाकपात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखान्याला जिल्हा बँकेतून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उसाची बिले तोडणी-वाहतूक, हंगामी कंत्राटदारांची बिले व कामगारांचा पगार वेळेवर अदा केले जात आहेत.
त्यामुळे गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सभासद व बिगर सभासदांनी आपण पिकविलेला संपूर्ण ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही पताडे यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, कार्यकारी संचालक सुनील महिंद, संचालक व खातेप्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा: चोरट्या आयातीने बिघडले बेदाणा दराचे गणित; व्यापाऱ्यांच्या नफेखोरीचा मोह शेतकऱ्यांच्या मुळावर
