मुंबई : कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्रांसाठी सरकारकडून अनुदान देणार आहे.
यासाठी राज्य सरकारने पुढील तीन वर्षांसाठी ५,६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यांनी सांगितले की, कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे.
यामध्ये २५ हजार रुंद सरी वरंबा यंत्रासाठी १७५ कोटी, १४ हजार वैयक्तिक शेतळ्यासाठी ९३ कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी ५ हजार कोटी आणि ५ हजार ड्रोनसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.
राज्यभरात २५ हजार बीबीएफ यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी एक यंत्र दर हंगामात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर काम करू शकते. परिणामी २५ लाख हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत लागू करता येईल.
अधिक वाचा: तब्बल ३८ वर्षांनी राज्याच्या कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह व नवे घोषवाक्य
