Lokmat Agro >शेतशिवार > हापूस ते तोतापुरी; जाणून घ्या आंब्याच्या विविध जाती आणि त्यांची उत्पादक राज्ये

हापूस ते तोतापुरी; जाणून घ्या आंब्याच्या विविध जाती आणि त्यांची उत्पादक राज्ये

From Hapus to Totapuri; Know the different varieties of mango and their producing states | हापूस ते तोतापुरी; जाणून घ्या आंब्याच्या विविध जाती आणि त्यांची उत्पादक राज्ये

हापूस ते तोतापुरी; जाणून घ्या आंब्याच्या विविध जाती आणि त्यांची उत्पादक राज्ये

Mango Day : आज देशभरात 'राष्ट्रीय आंबा दिन' साजरा केला जात असून भारताचा राष्ट्रीय फळ असलेला आंबा हा चव, सुगंध आणि पोषणमूल्य यामुळे जगभरात ख्यातीला आहे.

Mango Day : आज देशभरात 'राष्ट्रीय आंबा दिन' साजरा केला जात असून भारताचा राष्ट्रीय फळ असलेला आंबा हा चव, सुगंध आणि पोषणमूल्य यामुळे जगभरात ख्यातीला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आज देशभरात 'राष्ट्रीय आंबा दिन' साजरा केला जात असून भारताचा राष्ट्रीय फळ असलेला आंबा हा चव, सुगंध आणि पोषणमूल्य यामुळे जगभरात ख्यातीला आहे.

भारतात आंब्याच्या सुमारे १०० पेक्षा जास्त जाती आढळतात आणि देशाच्या विविध भागांत या जातींचं उत्पादनही होतं. आज या विशेष दिनाच्या अनुषंगाने जाणून घेऊया आंब्याच्या निवडक काही लोकप्रिय आणि प्रमुख जाती तसेच त्यांची उत्पादक राज्ये यांचा आढावा.

हापूस आंबा - गौरव महाराष्ट्राचा

आंब्यांचा राजा म्हणून परिचित असलेला हापूस आंबा ज्याला अल्फोन्सो म्हणूनही ओळखले जाते तो प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कोकण विभागात पिकवला जातो. विशेषतः देवगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे हापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. हापूसची चव, सुवास आणि पोत यामुळे तो देशातच नव्हे, तर परदेशातही निर्यात केला जातो.

केशर आंबा - गुजरात व महाराष्ट्राचा सुवर्णगौरव

केशर आंबा गुजरात राज्यातील गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात उत्पत्ती पावलेला असून, तो "सुवर्णसारखा" रंग आणि गोडसर रस यामुळे ओळखला जातो. केशर आंब्याचं उत्पादन आता महाराष्ट्रातही वाढत असून विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ भागात याचं व्यापकरीत्या लागवड केली जाते.

लंगडा आंबा - उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध

लंगडा आंबा, वाराणसी आणि आसपासच्या उत्तर प्रदेशातील भागांमध्ये फार प्रसिद्ध आहे. त्याची गंध व गोडसर चव यामुळे तो उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पसंत केला जातो. याच्या उत्पादनासाठी कमी क्षेत्र असूनही मागणी कायम उच्च असते.

बदामी आंबा - कर्नाटकाचा ‘दक्षिणेचा हापूस’

कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील भाग विशेषतः बागलकोट, धारवाड आणि बेलगावी जिल्हे हे बदामी आंब्याचे प्रमुख उत्पादक भाग आहेत. बदामीला ‘दक्षिणेचा हापूस’ म्हणून संबोधलं जातं. रसाळ व गोडसर असा हा आंबा स्थानिक बाजारपेठेबरोबरच निर्यातीसाठीही महत्त्वाचा आहे.

तोतापुरी - प्रक्रिया उद्योगांचा बादशहा

तोतापुरी आंबा, जो आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो त्याचा विशिष्ट आकार आणि कमी गोडी यामुळे तो खाद्यप्रक्रिया उद्योगात अत्यंत उपयुक्त आहे. ज्यूस, पल्प आणि विविध प्रकारच्या अन्नपदार्थांत त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

आरोग्यदायी आणि स्वादिष्ट फळ

आंबा केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. यात विविध जीवनसत्त्वे (विशेषतः व्हिटॅमिन A आणि C), अँटीऑक्सिडंट्स, आणि नैसर्गिक गोडवा यांचा समावेश असतो. उन्हाळ्यातील प्रमुख फळ म्हणून आंबा सर्व वयोगटांमध्ये प्रिय आहे.

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

Web Title: From Hapus to Totapuri; Know the different varieties of mango and their producing states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.