ऊस, भुईमूग पिकावर वाढत चाललेल्या हुमणीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर मेटारयाम हे जैविक औषध वाटप सुरू झाले आहे.
लोकमतने आठ दिवसांपूर्वी ऊस, भुईमूग पिकावर हुमणीचे आक्रमण झाले असून कृषी विभाग याबाबत हालचाल करत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत कृषी विभागाने तातडीने औषध उपलब्ध करून वाटप सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५० टक्के अनुदानावर २ हजार किलो औषधांचे वाटप करण्याचे नियोजन करून तालुकानिहाय पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती तत्काळ औषधे वितरण सुरू झाले करून आहे.
प्रति १ किलोची किंमत २०० रुपये आहे. परंतु त्यामध्ये ५० टक्के अनुदान देत १०० रुपयाला विक्री केली जाते. यासाठी एकूण चार लाख रुपयांची तरतूद केली आहे. कृषी महाविद्यालयातून हे औषध उपलब्ध केले आहे.
दरम्यान, हुमणीचा प्रादुर्भाव थांबला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हुमणी प्रतिबंधास मदत
पंचायत समितीच्या कृषी विभागात वाटपाचे नियोजन सुरू आहे. हुमणीने अक्षरशः ऊस, भूईमूग पिकाची मुळे खात औषधामुळे हुमणी प्रतिबंधास पिकांना अशक्त बनविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या मदत होईल.
औषधाचे वाटप सुरू (आकडेवारी प्रत्येकी किलोमध्ये)
हातकणंगले - ३००
कागल व पन्हाळा - २५०
करवीर, शिरोळ - २००
गडहिंग्लज, राधानगरी, शाहूवाडी - १५०
आजरा, भुदरगड, चंदगड - १००
गगनबावडा - ५०
हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर