Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत गाळ; राज्यातील प्रमुख धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:34 IST

राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली. यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचे नियोजन केले जाणार आहे.

अहिल्यानगर : जिल्ह्यासह राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली. यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचे नियोजन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

अहिल्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, मुळा धरणात ३ टीएमसी गाळ साचला आहे. धरणांतील गाळ काढला तर अनेक प्रश्न कमी होतील. पहिल्या टप्प्यात चार धरणांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.

धरणात किती गाळ साचला आहे, हे यातून समजणार आहे. धरणातील काढलेला गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार आहे. मुळा धरणात ३ टीएमसी गाळ साचला असण्याची शक्यता आहे.

शिवाय जायकवाडी धरणात १५-२० टीएमसी तर उजनी धरणात १०-१५ टीएमसी गाळ साचला असण्याची शक्यता विखे पाटील यांनी व्यक्त केली पहिल्या टप्प्यात चार धरणातील गाळ काढला जाणार आहे.

अधिक वाचा: वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीचा खर्च आता वाचणार; वाचा महसूल विभागाचा 'हा' नवीन निर्णय?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmers to Get Free Silt; Dams to Be Surveyed.

Web Summary : Maharashtra farmers will receive free silt from dams after surveys to determine silt accumulation. The initiative aims to restore dam capacity. Pilot surveys will focus on four dams initially, with potential for significant silt removal from dams like Jayakwadi and Ujani.
टॅग्स :धरणपाणीशेतीशेतकरीअहिल्यानगरराधाकृष्ण विखे पाटीलपालक मंत्रीमुळा मुठाउजनी धरणजायकवाडी धरण