lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांनो घाबरू नका.. कॅन्सर आहे की नाही याची टेस्ट होतेय फक्त इतक्या रुपयात

शेतकऱ्यांनो घाबरू नका.. कॅन्सर आहे की नाही याची टेस्ट होतेय फक्त इतक्या रुपयात

Farmers don't be afraid.. Cancer test is done for only this much rupees | शेतकऱ्यांनो घाबरू नका.. कॅन्सर आहे की नाही याची टेस्ट होतेय फक्त इतक्या रुपयात

शेतकऱ्यांनो घाबरू नका.. कॅन्सर आहे की नाही याची टेस्ट होतेय फक्त इतक्या रुपयात

देशभरात आता कॅन्सरचे निदान लवकर आणि कमी खर्चात शक्य होणार आहे.

देशभरात आता कॅन्सरचे निदान लवकर आणि कमी खर्चात शक्य होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

देशभरात आता कॅन्सरचे निदान लवकर आणि कमी खर्चात शक्य होणार आहे. कॅन्सर आहे की नाही, याचे निदान होण्यासाठी प्रयोगशाळेत किमान ५० हजार रुपये किमतीच्या फ्लोरोसेंट फिल्टरच्या मदतीने चाचणी करण्यात येत होती.

मात्र, आता यासाठी १० रुपयांचा ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टर वापरण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.

हे आजारही कळणार
ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टर पेशींमध्ये विशिष्ट प्रथिने दाखविते. या फिल्टरच्या मदतीने अनुवांशिक रोग, बॅक्टेरिया आणि विषाणू संक्रमणास कारणीभूत पेशी शोधणेही शक्य होईल.

नेमके किती पैसे वाचणार?
-
या नवीन चाचणीमुळे रुग्णांना सध्या होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्के रक्कमच खर्च करावी लागणार आहे.
बरकतुल्ला युनिव्हर्सिटी (बीयू) मध्ये केलेल्या संशोधनामुळे हे शक्य झाले आहे.
- या महत्त्वपूर्ण संशोधनाला पेटंटही मिळाले आहे. कॅन्सरच्या पेशी कोणत्या स्तरावर आहेत, त्यांची सद्यःस्थिती काय आहे आणि त्या शरीराच्या कोणत्या भागाकडे जात आहेत, हे शोधणे आत्ता यामुळे सोपे होणार आहे.

किंमत कमी का?
या फिल्टरची किंमत खूपच कमी आहे. विभागप्रमुख प्रा. डॉ. रेखा खंडिया यांनी सांगितले की, बाजारातही फ्लोरोसेंट फिल्टरही उपलब्ध आहेत. त्यांची किमत सुमारे ४५ ते ५० हजार रुपये आहे, तर हा नवीन फिल्टर फक्त १० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे रुग्णांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

नेमका कशाला केला वापर?
■ बीयूच्या बायोकेमिस्ट्री आणि जेनेटिक्स विभागाने हे फिल्टर तयार केले आहे. विभागप्रमुख प्रा. डॉ. रेखा खंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीचे विद्यार्थी उत्संग कुमार आणि शैलजा सिंघल यांनी हे संशोधन केले आहे.
■ संशोधकांनी सांगितले की, यामध्ये विशिष्ट प्रथिनांची निर्मिती दाखविण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो. सध्या बाजारात उपलब्ध असलेले फिल्टर क्वार्ट्सचे बनलेले असून, ते खूप महाग आहेत.
■ बीयूमधील नवीन फिल्टर जिलेटिन शीटपासून बनविलेले असून, हा पॉलिमरचा एक प्रकार आहे. तो कमी किमतीत उपलब्ध आहे.

अधिक वाचा: उन्हामध्ये शेतात काम केलंय अन् फ्रीजचे गार पाणी पिताय.. आरोग्यासाठी ठरू शकते घातक

Web Title: Farmers don't be afraid.. Cancer test is done for only this much rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.