प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत जि. रायगड कार्यालयामार्फत रायगड/ठाणे/पालघर जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण शेवगा झाडाची शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
शोध मोहिमे अंतर्गत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शेवगा झाडाच्या शेगांचा शेवगा महोत्सव दिनांक ०९/०५/२०२५ रोजी प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत ता. कर्जत जि. रायगड येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सह्याद्री अतिथीगृह हॉलमध्ये आयोजित केलेला आहे.
आपणांस विनंती करण्यात येते की, आपल्या अधिपत्याखालील सर्व मा. उपविभागीय कृषि अधिकारी/मा. तालुका कृषि अधिकारी यांना सदर शोध मोहिमेत सहकार्य करण्याबाबत अवगत करण्यात यावे तसेच वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या शेवगा झाडाच्या शेतकऱ्यास शेवगा महोत्सवात उपस्थित राहण्याबाबत प्रोत्साहन देण्यात यावे.
शेवगा झाडाची वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म थोडक्यात पुढीलप्रमाणे
१) रायगड/ठाणे/पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडे असलेले शेवगा झाड माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर ते माहे मार्च-एप्रिल पर्यंत फुलोरा/फुले धरणारे असावे.
२) सदर झाडाचे वय कमीत कमी १० (दहा) वर्ष असावे.
३) शेवगा शेंगांची लांबी अंदाजित ३५ ते ४५ से.मी पर्यंत असावी.
शेवगा शेंगांच्या नमुन्यासोबत शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे माहिती कृपया जोडावी.
१) शेतकऱ्याचे पुर्ण नाव.
२) संपुर्ण पत्ता.
३) भ्रमणध्वनी क.
४) नमुना ज्या जागेवरून घेतला त्याजागेचा अक्षांश/रेखांश.
५) नमुन्याची वैशिष्टये (शेगांची लांबी, फुलोरा येण्याचा महिना, झाडाचे वय, एकुण शेगांची संख्या अंदाजित)
उपरोक्त गुणधर्म असलेल्या शेवगा झाड मालक शेतकऱ्यास सन २०२५-२६ या वर्षातील झाडाचे गुणधर्म तपासून कमिटी मार्फत खालीलप्रमाणे प्रोत्साहन पर रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल.
१) प्रथम क्रमांक - रू. २,०००/- (रू. दोन हजार मात्र) (एक बक्षीस)
२) व्दितीय क्रमांक बक्षीस - रू. १,५००/- (रू. दिड हजार मात्र) (एक बक्षीस)
३) तृतीय क्रमांक बक्षिस - रु. १,०००/- (रू. एक हजार मात्र) (एक बक्षीस)
वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या शेवगा झाडाच्या शेंगांचा शेवगा महोत्सव यशस्वी होण्यासाठी आपण आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी adrkarjat@rediffmail.com या इमेलवर अथवा सहाय्यक उद्यानविद्यावेत्ता डॉ. आर.डी. सावळे यांना भ्रमणध्वनी क. ९८६०३५३०७६ (कार्यालयीन वेळ सकाळी ८.०० ते १२.३० दुपारी २ ते ५.३० पर्यंत) वर संपर्क करावा.
अधिक वाचा: Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर