lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > निसर्गाच्या लहरीमुळे शेतकरी हतबल, बागांवर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ

निसर्गाच्या लहरीमुळे शेतकरी हतबल, बागांवर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ

Farmers desperate due to the whims of nature, time to swing the ax on the orchards | निसर्गाच्या लहरीमुळे शेतकरी हतबल, बागांवर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ

निसर्गाच्या लहरीमुळे शेतकरी हतबल, बागांवर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ

दुष्काळ असूनही शासनाने उपाययोजना न केल्याने बागा जगविणे अवघड असल्याने शेतकरी फळबागांवर कुन्हाड फिरवत आहेत.

दुष्काळ असूनही शासनाने उपाययोजना न केल्याने बागा जगविणे अवघड असल्याने शेतकरी फळबागांवर कुन्हाड फिरवत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

हवामानाचा फटका; शेतकऱ्यांवर बागा तोडण्याची वेळ

निफाड तालुक्यातील पूर्वभाग बागांचा भाग म्हणून प्रचलित आहे. या भागात द्राक्ष, डाळिंब, पेरू, चिकू आदींचे क्षेत्र आहे. वातावरणातील सततच्या बदलाचा प्रादुर्भाव आणि होणारे आर्थिक नुकसान यामुळे खेडलेझुंगे, रूई, वाकद, देवगांव धारणगांव वीर व खडक, कोळगांव, बोकडदरे परिसरासह अन्य गावांतील शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ आली आहे. शासनाने बळिराजाला मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त होत आहे.

शेतकरी निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झाला आहे. निसर्गाच्या तावडीतून वाचविलेल्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट गडद होत फळबागा वाचविण्याचे प्रयत्न असफल होत असल्याने शेतकरी वर्ग फळझाडांवर कुन्हाड फिरवत आहे.

जिवापाड जपलेली बाग तोडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर होतात, परंतु अधिकचे नुकसान होऊ नये यासाठी बागा तोडणे परवडत आहे. खेडलेझुंगे, रूई, वाकद, देवगांव धारणगांव वीर व खडक, कोळगांव, बोकडदरे परिसरातील शेतकरी पूर्वीपासून फळबागायतदार आहेत.

निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांना न मिळणारा भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. यंदा दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. विकत पाणी घेऊन बागा वाचविण्याएवढा पैसा शिल्लक नाही. दुष्काळ असूनही शासनाने उपाययोजना न केल्याने बागा जगविणे अवघड असल्याने शेतकरी फळबागांवर कुन्हाड फिरवत आहेत. खरिपाचा विमा मंजूर होऊनही मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ पंचवीस टक्केच रक्कम जमा झाली, बाकी रक्कम केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे.

विकतचे पाणी घेऊन शेती करणे अवघड

■ उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे. त्यामुळे बागा तोडण्याचा कठोर निर्णय काळजावर दगड ठेऊन घेतला जात आहे. यावर्षी दमदार पाऊस पडलेला नाही त्यामुळे विहिरीत पाणी नाही. शेततळे भरता आले नाही. पाणी विकत घेऊन बाग जगविणे कठीण असल्याने बाग तोडण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत.

■ दोन वर्षांपासून बागांवर प्लेग, करपा, भुरी, बुरशी, तेल्या आदींसह विविध रोग पडत असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे. त्यात दुष्काळाची भर पडल्याने बागा तोडण्याचा निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. शासन पिकविण्यासाठी मदत करत नाही. शेतकऱ्यांना कुणी वाली राहिलेले नाही. शासनस्तरावर याबाबत तत्काळ दखल घेऊन फळबागा वाचविण्यास अनुदान देऊन शेतकऱ्यांसह बागा वाचविण्याची शेतकरी करत आहेत.

Web Title: Farmers desperate due to the whims of nature, time to swing the ax on the orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.