Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांनो फार्मर आयडी असेल तरच महाडीबीटी पोर्टलवरून करता येणार योजनांसाठी अर्ज

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी असेल तरच महाडीबीटी पोर्टलवरून करता येणार योजनांसाठी अर्ज

Farmers can apply for schemes through MahaDBT portal only if they have Farmer ID | शेतकऱ्यांनो फार्मर आयडी असेल तरच महाडीबीटी पोर्टलवरून करता येणार योजनांसाठी अर्ज

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी असेल तरच महाडीबीटी पोर्टलवरून करता येणार योजनांसाठी अर्ज

Farmer Id शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविता यावा यासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

Farmer Id शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविता यावा यासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविता यावा यासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, पॅनकार्ड, ७/१२, ८-अ खाते उतारा, बँक खात्याचा तपशील तसेच आधार संलग्न मोबाईल क्रमांक घेऊन ३१ मे पूर्वी आपला शेतकरी ओळख क्रमांक आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर येथे जाऊन तयार करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अॅग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे.

कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रीस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल.

फार्मर आयडीमुळे शेतकरी आणि कृषी-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल. यासाठी फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे.

पूर्वी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन आयडी पासवर्ड तयार करून नोंदणी करता येत होती परंतु त्यात आता बदल करण्यात आला आहे आता शेतकऱ्यांचा फार्मर आयडी दिल्याशिवाय लॉगीन करता येत नाही.

अधिक वाचा: शेती आधारित उद्योगासाठी फलोत्पादन अभियानात नवीन पाच घटकांचा समावेश; कसा घ्याल लाभ?

Web Title: Farmers can apply for schemes through MahaDBT portal only if they have Farmer ID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.