सुनील चौरे
उमरी येथील प्रवीण अमृते या तरुण शेतकऱ्याच्या पपईचा डंका मुंबईसह गुजरात व दिल्लीतही वाजत आहे. या पपईने महानगरांना वेड लावले असून पपईची (Umri's papaya) मागणी वाढली आहे. ६० गुंठ्यात सात लाखांचे उत्पन्न या शेतकऱ्यांनी घेतले आहे.
पारंपरिक शेतीला बगल देत सुशिक्षित प्रवीण अमृते हा तरुण आईवडिलांच्या मदतीने शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहेत. त्यांच्यामुळे इतर शेतकरी नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस करीत आहेत.
२०२० मध्ये कोरोनाने हाहाकार उडाला असताना अनेकाचे उद्योगधंदे गेले. या काळात अनेक तरुण शेतीच्या कामात गुंतले. शेती पारंपरिक पद्धतीने न करता व्यवसाय म्हणून केल्यास त्यात फायदा निश्चित होतो. हा आत्मविश्वास तरुणाला आला. (Umri's papaya)
शेतीत मजुर मिळत नाहीत म्हणून यांत्रिक शेती झाली. तरीपण कष्ट करण्याची आवड असलेले अनेक शेतकरी काहीतरी वेगळे करुन इतरांसमोर आदर्श निर्माण करीत आहेत.
६० गुंठ्यात घेतले पपई पीक
उमरीच्या प्रवीण अमृते यांनी ६० गुंठ्यांत पपई पीक घेण्याचे ठरविले. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. या पिकासाठी ६५ हजार रुपये त्यांना खर्च आला. पपईच्या पिकात हरभरा पिकाचे अंतरपीक घेतले. दोन्ही मिळून तीन महिन्यात त्यांना ७ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
नांदेडच्या बाजारपेठेसह अमृते यांच्या शेतातील पपई मुंबई व त्यानंतर गुजरात व दिल्लीलाही पोहचली. (Umri's papaya)
नवीन प्रयोग करावेत
पपईचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यावर्षी एक हेक्टरमध्ये मी पपईची लागवड करणार आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्टाचे फळ निश्चित मिळते. तरुण मंडळीने हिमतीने शेतीत प्रयोग करावेत. - प्रवीण अमृते, उमरी जहा, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर : Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग