बालेखान डांगे
चरण: चरण (ता. शिराळा) येथील पांडुरंग नायकवडी यांनी दहा गुंठ्यामध्ये काकडी लावली आहे. दीड महिन्यातच काकडी पीक जोमात आले.
गेली आठ दहा दिवस रोज ७० ते ८० किलो काकडी रोज निघत आहे. काकडीस दर ८० किलो रुपये प्रमाणे गावातच विकली जात आहे.
काकडी कोवळी व चवदार असल्याने लोकांची मागणी आहे. एक-दोन तासात ७० ते ८० किलो काकडीची विक्री होते. यामध्ये पांडुरंग यांना त्यांचा मुलगा, पत्नी व आईची सुद्धा मदत होते.
अधिक वाचा: जत तालुक्यातील शेतकरी रवी पाटलांनी एकरी १७ टनांचे उत्पादन घेत सीताफळ शेतीत केली क्रांती
जून महिन्याअखेर उत्पन्न आम्हाला मिळणार, असे पांडुरंग खात्रीने सांगतात. शेतकरी असल्याने ग्राहकाससुद्धा वजनापेक्षा जास्त काकडी देण्याचा दिलदारपणा पांडुरंग या शेतकऱ्याकडे आहे.
पांडुरंग यांना याबाबत विचारले असता काकडीचे बियाणे चांगले लागले आहे. पीक जोमाने आल्याने काकडीस वाढ असल्याने रोज काकडी काढायला जावे लागते.
जून झालेल्या काकडीस मागणी कमी व दरसुद्धा कमी मिळतो. या उलट कोवळ्या काकडीस ग्राहकांची मागणी अधिक आहे. आठ ते दहा वेळा पाणी, कीड फवारणीकडे सुद्धा लक्ष असल्याचे ते म्हणतात.
यावेळी काकडीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कुटुंबास चांगला हातभार लागत असल्याचे आवर्जून सांगायला विसरत नाही. पांडुरंगचा हा शेतीतील प्रयोग इतरांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
अधिक वाचा: यंदाच्या खरीपात सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी टॉप १० जाती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर