Lokmat Agro >शेतशिवार > Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी?

Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी?

Farmer id: This district is at the forefront of 'Farmer ID' registration in the state; How many registrations in which district? | Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी?

Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी?

राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

महसूल व कृषी विभागाच्या वतीने 'फार्मर आयडी' काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्यात आतापर्यंत ४४ लाख २२ हजार १८२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आघाडीवर आहे, तर जळगाव दुसऱ्या व कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी, हा उद्देश असून, राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे. शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत.

'फार्मर आयडी'ची उपयुक्तता
सरकारी योजनांचा लाभ सहजरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. मध्यस्थांची भूमिका कमी करणे. आयडी तयार झाल्यानंतर, शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. विविध योजनांमधील भ्रष्टाचारापासूनही मुक्तता मिळेल. 

पीएम किसान योजनेची पडताळणी सोपी
केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान योजनेतून देते. फार्मर आयडीमुळं अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असल्याची खात्री होते. त्यामुळे पडताळणी देखील सोपी होते. 

जिल्हानिहाय फार्मर आयडीची नोंदणी
जिल्हा - शेतकरी

अहिल्यानगर - ३,२०,०७८
जळगाव - २,८४,५४७
कोल्हापूर - २,७६,९२०
सातारा - २,७४,९४२
नाशिक - २,६७,०१८
पुणे - २,२६,११५
बुलढाणा - १,९३,०१९
बीड - १,८४,८३५
अमरावती - १,५५,८४९
सोलापूर - १,५५,१५५
सांगली - १,५२,३८९
यवतमाळ - १,४४,२५४
संभाजीनगर - १,३१,५२८
जालना - १,२५,१४९
गोंदिया - १,१४,५५०
नांदेड - १,०४,१४७
चंद्रपूर - १,०२,५१३
अकोला - ९३,२२८
धाराशिव - ९२,८३४ 
परभणी - ९१,७५२ 
धुळे - ९१,१७८ 
वाशिम - ८८,१०३ 
लातूर - ८२,३९७
भंडारा - ८०,८५० 
हिंगोली - ७८,६६५ 
वर्धा - ७७,७३० 
नागपूर - ७६,६६५ 
गडचिरोली - ७३,४४१ 
नंदूरबार - ६३,६७६ 
रत्नागिरी - ५६,१६६ 
पालघर - ५१,९४० 
रायगड - ४७,२८६ 
ठाणे - ३७,७४८ 
सिंधुदुर्ग - २४,८४९ 
मुंबई - ३२३

अधिक वाचा: Farmer id : घरबसल्या आता तुमच्या मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी; लवकरच होणार हा बदल

Web Title: Farmer id: This district is at the forefront of 'Farmer ID' registration in the state; How many registrations in which district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.