Lokmat Agro >शेतशिवार > 'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली

'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली

'Excessive rain' threatens oranges; Attacks of fungal diseases like 'Phytophthora brown rot' and fruit drop also increase | 'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली

'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली

यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे.

यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अमरावती जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे. तसेच या परिस्थिमुळे आंबिया बहराची मोठ्या प्रमाणात फळगळ देखील होत असल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.

दरम्यान फळगळ होण्यासाठी केवळ हीच कारणे नसून यासह इतरही कारणांमुळे संत्र्यांची फळगळ होत आहे. तर परिपक्व किंवा परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेल्या फळांवर सुरुवातीला पाणी शोषल्यासारखे चट्टे दिसत येत आहे. जे नंतर मऊ पडत असून त्यांचा रंग पिवळसर-तपकिरी होतो.

याशिवाय या संक्रमित फळांना उग्र वास आहे. तसेच जास्त आर्द्रतेमुळे फळांच्या सालीवर पांढऱ्या बुरशीचा (मायसेलिया) थर तयार होत आहे. 

जमिनीच्या दोन फुटावर छाटणी करा

'ब्राऊन रॉट'चे व्यवस्थापनासाठी जमिनीपासून २४ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवरून झाडाची छाटणी केल्याने या रोगाचे प्रमाण कमी होते. जून-जुलैच्या दरम्यान किंवा पहिल्या पावसाच्या अगोदर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची (१ टक्का बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड, ३.० ग्रॉम / लिटर) फवारल्यास दमट हंगामात झाडाचे संरक्षण होते असे कृषी विभागाने सांगितले आहे.

...तर पॅकेजिंगची सुविधा नाकारणार

ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यांत वरील बुरशीनाशकाची पुन्हा फवारणी करावी. संक्रमित फळबागांमध्ये फॉसेटिल ॲल्युमिनियम किंवा मेफेनोक्झाम एमझेड, २.५ ग्रॅम / लिटर पाण्यात फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. फळतोडणीवेळी संक्रमित फळे क्रेट, बॉक्समध्ये टाकू नये, अन्यथा प्रक्रिया किंवा पॅकेजिंगची सुविधा नाकारण्यात येऊ शकते.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

Web Title: 'Excessive rain' threatens oranges; Attacks of fungal diseases like 'Phytophthora brown rot' and fruit drop also increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.