Lokmat Agro >शेतशिवार > e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

e Pik Pahani : Now the crop inspection will be done instantly; Use the updated version of 'this' mobile app | e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

e pik pahani राज्य सरकारच्या 'ई-पीक पाहणी' योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक नोंदणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अंतिम टप्प्यात शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.

e pik pahani राज्य सरकारच्या 'ई-पीक पाहणी' योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक नोंदणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अंतिम टप्प्यात शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्य सरकारच्या 'ई-पीक पाहणी' योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक नोंदणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अंतिम टप्प्यात शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.

१ ऑगस्टपासून सुरू झालेली ही प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाइल अ‍ॅप किंवा पोर्टलद्वारे स्वतः नोंदवणे बंधनकारक आहे.

या योजनेत शेतकरी स्वतः किंवा सहायकांच्या मदतीने पिकांची नोंद सात-बारा उताऱ्यावर ऑनलाइन करू शकतात. त्यासाठी आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाइल नंबर आवश्यक आहे.

पिकांच्या नोंदीसोबत बांधावरील आंबा, पिंपळ, कडूनिंब आदी झाडांची संख्या व प्रकार नोंदवणे आणि त्यांचे फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. याशिवाय शेतातील चालू पड किंवा कायम पड क्षेत्राची नोंदही यात करता येते.

यंदा संबंधित गटाच्या हद्दीपासून ५० मीटरच्या आतील पिकांचे दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य केले आहे. नोंदणीदरम्यान काही त्रुटी झाल्यास ४८ तासांच्या आत अ‍ॅपद्वारे दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रशासनाकडून शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम मुदतीनंतर नोंदणी झाल्यास पीकविमा, अनुदान आणि शासकीय योजनांच्या लाभात अडथळे येऊ शकतात, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

राज्यात आता ई-पीक पाहणी प्रकल्प
मागील काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी प्रयोगानंतर, यंदा हा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांत लागू करण्यात आला आहे. प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना आपली पीक नोंदणी डिजिटल पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे.

अपडेटेड डीसीएस अ‍ॅपमधील सुविधा
नवीन आवृत्तीमध्ये जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग, ५० मीटरच्या परिघातील फोटो व्हेरिफिकेशन, तसेच ऑफलाइन मोडमध्ये डेटा सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

बांधावरची झाडे आणि पड क्षेत्राची नोंद
शेतात पिकाबरोबर बांधावर लावलेली झाडे किंवा पड क्षेत्र असल्यास त्याची नोंद करणे बंधनकारक आहे. ही माहिती कृषी विभागाला शेतजमिनीच्या सर्वांगीण वापराचे चित्र दाखवेल.

असे वापरावे 'डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅप'
१) अ‍ॅप डाउनलोड आणि लॉगिन

गुगल पे-स्टोअरवरून 'ई-पीक पाहणी डीसीएस ४.०.०' हे अपडेटेड व्हर्जनचे अ‍ॅप डाउनलोड करावे. त्यानंतर आधार आणि मोबाइल नंबर वापरून लॉगिन करावे. लॉगिन झाल्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा गट क्रमांक निवडावा. पिकांची माहिती जसे की पीक क्षेत्र, पेरणीची तारीख आदी काळजीपूर्वक भरा.
२) फोटो अपलोड करणे
अ‍ॅपमध्ये आता ५० मीटरच्या आतून पिकांचा फोटो काढणे बंधनकारक आहे, जेणेकरून पिकाची अचूक माहिती मिळेल. एकदा माहिती जतन (सेव्ह) केल्यावर, ती आपोआप सातबारावर नोंदवली जाते. यामुळे शेतातील पिकांची नोंदणी अधिकृतपणे होते.
३) दुरुस्ती करण्याची सोय
नोंदणी करताना काही चूक झाल्यास, शेतकरी ४८ तासांच्या आत अ‍ॅपमधून ती दुरुस्त करू शकतात.
४) बांधावरील झाडे आणि पडीक क्षेत्राची नोंद
या अ‍ॅपमुळे बांधावरील झाडे आणि पडीक क्षेत्राची नोंदही करता येते. त्यामुळे जमिनीच्या संपूर्ण क्षेत्राची अचूक माहिती मिळते.
५) नकाशावर स्थान निश्चिती
अ‍ॅपमध्ये नकाशावर शेताच्या स्थानाची निश्चिती करण्याची सोय असल्याने अचूकता वाढते. याची मदत घेत शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करून घ्यावी.

डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे ई-पीक पाहणी
यावर्षी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाइल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर ४.०.० व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांना अ‍ॅप डाउनलोड करून ऑनलाइन पीकपेरा नोंद करावी

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहायकांची नेमणूक
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक गावात सहायक नेमले जाणार आहेत. हे सहायक अ‍ॅपचा वापर, पिकांची नोंदणी आणि फोटो अपलोड करण्यास मार्गदर्शन करतील.

अधिक वाचा: उसाच्या पट्ट्यात आले पिक बहरले; पाडेगावचे शेतकरी रमेश यांनी एकरात ११ लाख कमवले

Web Title: e Pik Pahani : Now the crop inspection will be done instantly; Use the updated version of 'this' mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.