'एसडीएफ'च्या कर्जापोटी कारखान्यावर असलेली टांगती तलवार दूर करून तासगावकर काळातील थकीत एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
तासगावकर काळातील थकीत एफआरपीची प्रक्रिया सुरू केली होती; पण एनसीडीसीने थकीत कर्जापोटी हा दौलत कारखाना लिलावात काढला होता. त्यामुळे थकीत एफआरपीची रक्कम वाटप बंद केले होते.
कारखाना लिलाव टाळण्यासाठी न्यायालयीन लढा यशस्वी करून कारखाना सभासदांचा ठेवण्यात नुकतेच यश मिळवले.
त्याचवेळी आश्वासन दिल्याप्रमाणे थकीत एफआरपीची रक्कम देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याची माहिती अथर्व प्रशासनाने दिली.
त्यामुळे शेतकऱ्यांना १४ वर्षांनंतर ऐन दिवाळीत ही रक्कम मिळाल्याने मानसिंग खोराटे यांनी दिलेले आश्वासनही पूर्ण केले.
दौलत पुन्हा बंद पाडण्याचा घाट
◼️ 'दौलत'ची कामगार संघटना जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर 'अथर्व'नेही त्यांच्याकडे कायदेशीर व आर्थिक निकषावर आपली बाजू मांडली.
◼️ त्यानंतर मार्ग काढण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर कामगार संघटना यांच्याशी चर्चा करण्यास मी स्वतः आलो होतो; परंतु चर्चेस बोलवूनही ते आले नाहीत.
◼️ त्यांच्या मागणीच्या आडून काहीतरी वेगळीच आखणी करून त्यांनी कारखाना बंद पाडण्याचा घाट घातल्याची शक्यता आहे.
◼️ मात्र, शेतकरी आणि वाहतूकदारांसाठी कारखाना कुठल्याही परिस्थितीत वेळेवर सुरू करणारच, असा विश्वास 'अथर्व'चे खोराटे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा: बॉयलर पेटला, १७ साखर कारखाने सुरू होणार; गाळप जवळ कारखानदार दर कधी जाहीर करणार?