शिरोळ : येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा शंभर रुपये जादा दर जाहीर केला आहे. यापूर्वी 'दत्त'ने विनाकपात प्रतिटन एकरकमी ३४०० रुपये दर जाहीर केले होते.
आणखी प्रतिटन ७७ रुपये होणारी रक्कम हंगामानंतर देणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने बुधवारी रात्री प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
वाढीव दरामुळे 'दत्त'कडून प्रतिटन ३४७७ रुपयांची घोषणा झाली आहे. चालू हंगामासाठी एकरकमी प्रतिटन ३४०० रुपये विनाकपात देणार असल्याची घोषणा यापूर्वी 'दत्त'ने केली होती.
तसेच हंगाम समाप्तीनंतर जी रिकव्हरी येईल, त्याप्रमाणे शासन धोरणाप्रमाणे रक्कम द्यावी लागल्यास तीही कारखाना देईल असेही स्पष्ट केले होते. शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत.
मागण्यांबाबत संघटनाही ठाम आहेत. दरम्यान, 'दत्त'ची एफआरपी ३३७७ रुपये आहे. यामध्ये १०० रुपये जादा देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
कारखान्याने आरएसएफची माहिती शासनाला सादर केली असून, ती अदा करण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर
