Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > दामाजी कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर; पहिला हप्ता किती देणार?

दामाजी कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर; पहिला हप्ता किती देणार?

Damaji Factory announces sugarcane prices for this year's crushing season; How much will the first installment be paid? | दामाजी कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर; पहिला हप्ता किती देणार?

दामाजी कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर; पहिला हप्ता किती देणार?

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सन २०२५-२६च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गळीतास आलेल्या उसासाठी दर जाहीर केला आहे.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सन २०२५-२६च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गळीतास आलेल्या उसासाठी दर जाहीर केला आहे.

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सन २०२५-२६च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गळीतास आलेल्या उसाला प्रति मे. टन ३ हजार दर देण्यात येणार आहे.

यामध्ये २,८००चा पहिला हप्ता तत्काळ व दिवाळीला २०० अतिरिक्त रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

पहिल्या हप्त्याची रक्कम १ ते १५ नोव्हेंबर तसेच १६ ते ३० नोव्हेंबर या दोन्ही पंधरवड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित बँका व पतसंस्थांकडे थेट वर्ग केली आहे.

उपपदार्थ निर्मितीचा कोणताही प्रकल्प नसतानाही काटकसरीचे धोरण राबवून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी संचालक मंडळाने हा दर देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी खरात यांनी सांगितले की, चालू हंगामात आजअखेर ५४ दिवसांत १,५५,०२० मे. टन ऊस गाळप झाले असून १,३९,४०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

आजचा साखर उतारा १०.२४ टक्के, तर सरासरी उतारा ९.०४ टक्के आहे. सध्या गाळपासाठी प्रामुख्याने ०२६५ जातीचा ऊस येत आहे.

कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी ऊस बिले, कामगारांचे वेतन तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेत अदा केली जात असल्याचे सांगितले.

उपपदार्थांमधून उत्पन्नाचे साधन नसतानाही शेतकऱ्यांच्या विश्वासावर दामाजी कारखाना उभा आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि समाधानकारक दर देणे हीच आमची प्राथमिकता असून, म्हणूनच यंदा २,८०० पहिला हप्ता व दिवाळीला २०० असा एकूण ३,००० दर देण्याचा निर्णय घेतला आहे. - शिवानंद पाटील, चेअरमन, दामाजी शुगर

अधिक वाचा: यंदाच्या गाळप हंगामात ११ टक्केचा साखर उतारा ठेवत 'ह्या' साखर कारखान्याने मारली बाजी

Web Title : दमाजी चीनी मिल ने गन्ना दर की घोषणा की: पहली किस्त?

Web Summary : दमाजी चीनी मिल नवंबर 2025 में आपूर्ति किए गए गन्ने के लिए ₹3,000 प्रति टन का भुगतान करेगी। ₹2,800 की पहली किस्त तुरंत दी जाएगी, दिवाली के लिए ₹200 अतिरिक्त। मिल ने अब तक 1,55,020 टन गन्ने की पेराई की और 1,39,400 क्विंटल चीनी का उत्पादन किया।

Web Title : Damaji Sugar Factory Announces Sugarcane Rate for Season: First Installment?

Web Summary : Damaji Sugar Factory will pay ₹3,000 per ton for sugarcane supplied in November 2025. The first installment of ₹2,800 will be paid immediately, with ₹200 extra for Diwali. The factory has crushed 1,55,020 tons of sugarcane and produced 1,39,400 quintals of sugar so far.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.