मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने दि. १६ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या पंधरवड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यात आले आहे.
प्रति मे.टन २८५० रुपये दराने पहिला हप्ता त्यांच्या मागणीनुसार संबंधित बँका व पतसंस्थांमध्ये वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
ऊस उत्पादकांची धनश्री पतसंस्था, जिजामाता पतसंस्था, रतनचंद शहा बँक, धनलक्ष्मी पतसंस्था, लक्ष्मी पतसंस्था, भैरवनाथ बिले पतसंस्था, तसेच महाराष्ट्र व कर्नाटक गेटकेनमधील विविध बँकांमार्फत वर्ग करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी संचालक यांनी दिली.
यावेळी व्हा. चेअरमन तानाजीभाऊ खरात म्हणाले, चालू हंगामात आजअखेर २ लाख ३० हजार ०६० मे.टन उसाचे गाळप झाले असून, २ लाख १७ हजार २७५ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
सध्याचा साखर उतारा ११.१७टक्के असून आजअखेरचा सरासरी उतारा १०.०७ टक्के आहे. चालू हंगामात गळितास येणारा बहुतांश ऊस हा ०२६५ जातीचा आहे.
अधिक वाचा: परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावातील 'या' शेतकऱ्याला यंदाचा पद्म पुरस्कार जाहीर; जाणून घ्या सविस्तर
