आरोग्यम् धनसंपदा यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दहीफळ येथे उभारलेल्या परसबागेच्या पाहणीकरिता दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशियल कॅपिटल इन्स्टिट्यूट संस्थेच्या टीमने शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
सेंद्रिय खताद्वारे निर्मित, रासायनिक फवारणी मुक्त भाजीपाला, नैसर्गिक शाश्वत शेती, किचन गार्डन व परसबाग यावर सोशियल कॅपिटल इन्स्टिट्यूट ही संस्था कार्यरत आहेत. भारतातील निवडक गावात ही संस्था दरवर्षी भेट देऊन वास्तविक स्थितीची पाहणी करीत असते.
त्यातूनच यावर्षी यवतमाळ जिल्ह्यामधील नेर तालुक्यात अगदी टोकावरचे गाव असलेल्या दहीफळची निवड करून, शाळेतील परसबागेला सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. परसबागेत असलेल्या तीसहून अधिक प्रकारचा भाजीपाला हे पूर्णपणे पारंपरिक सेंद्रिय खतांचा वापर करून तयार केला जातो.
हे पाहून संस्थेचे अमेरिकन चेअरमन गीता मेहता, श्रद्धा गुप्ता, माजी बोर्ड मेंबर एसआयसी श्वेता झुंजूनवाला, प्रोग्राम व्यवस्थापक इमा गडेंफे गौरीश यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सोबत विदेशी प्रकल्प अधिकारी माधवी राजे, दीनदयाल प्रतिष्ठानचे सीईओ गजानन परसोडकर आदी उपस्थित होते.
शिक्षकांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांची शेतीबद्दलची आवड हा प्रकल्प पाहिल्यानंतर प्रकर्षाने दिसून आल्याचे मत सॉक्स मॅनेजर कांचन जाब्रस यांनी व्यक्त केले. सोबतीला दर्शन ढाकुलकर आणि सविता भोगे उपस्थित होते. टीममध्ये २५ पेक्षा जास्त मान्यवर सहभागी होते.
गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे, नितीन जाधव, संजय कुकडे, वंदना नाईक, अरविंद सरागे यांच्या प्रेरणेतून व मुख्याध्यापक बालाजी मुद्दमवार यांच्या कल्पनेतून मागील दोन वर्षापासून येथे सेंद्रिय भाजीपाला (परसबाग) उत्तम प्रकारे तयार करण्यात येत आहे. रासायनिक खते आणि फवारणीमुक्त, नैसर्गिक भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामध्ये दररोज केला जातो.
या परसबागेसाठी शिक्षक गजानन गौरकार, किशोर मुंडे, सुशील राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या विकासासाठी शामराव राठोड, कैलास ढाकूलकार, फिरोज पठाण, चरणदास चव्हाण आणि पालक वर्गाचे सहकार्य आहे.
हेही वाचा : हवामान बदलताना आपण आजारी का पडतो? जाणून घ्या कारणे आणि त्यावरील उपयांची सविस्तर माहिती
