Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पश्चिम महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीचे बेदाणा उत्पादन वाढले; ढासळलेल्या द्राक्ष बाजार दराचा परिणाम

पश्चिम महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीचे बेदाणा उत्पादन वाढले; ढासळलेल्या द्राक्ष बाजार दराचा परिणाम

Currant production in the grape plantations of western Maharashtra has increased; a result of the falling grape market price | पश्चिम महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीचे बेदाणा उत्पादन वाढले; ढासळलेल्या द्राक्ष बाजार दराचा परिणाम

पश्चिम महाराष्ट्राच्या द्राक्ष पंढरीचे बेदाणा उत्पादन वाढले; ढासळलेल्या द्राक्ष बाजार दराचा परिणाम

खते, वाढलेल्या औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च, वाढती मजुरी यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बेदाणाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.

खते, वाढलेल्या औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च, वाढती मजुरी यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बेदाणाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.

दुष्काळी परिस्थिती, पाण्याची तीव्र टंचाई, ढगाळ हवामान यांसारख्या संकटांना तोंड देत सांभाळलेल्या द्राक्षची काढणी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात अंतिम टप्प्यात आली आहे. गत वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्याने काड्यांना ऊन मिळाले नाही. त्यामुळे काड्या परिपक्व झाल्या नाहीत. घड कमी सुटले होते. परिणामी उत्पादनात घट झाली आहे. 

दुसरीकडे चांगला दर मिळत असल्याने यंदा उत्पादक शेतकऱ्यांची बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत छाटणी घेतली जाते. यावर्षी अनुकूल हवामान असल्याने दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही; पण महागडी औषधे, खते यांचा वापर करुन दावण्या, भुरी, घड कुजवा, मणी गळ प्रतिबंध केला होता.

अनेक अडचणींवर मात करीत द्राक्षबागा चांगल्या आणल्या आहेत. खते, वाढलेल्या औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च, वाढती मजुरी यामुळे बाजारातद्राक्षे विक्रीसाठी नेणे परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बेदाणाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.

तालुक्यातील बिळूर, डफळापूर, तिकोंडी परिसरातील शेतकरीद्राक्षेचे मार्केटिंग करतो. उमदी, संख, तर बालगाव, सिद्धनाथ, हळ्ळी, बेळॉडगी, जालिहाळ खुर्द परिसरातील शेतकरी बेदाणा करतो. आधुनिक तंत्रज्ञानची जोड उत्तम कौशल्याची जोड कोरड्या हवामानामुळे बागायतदारांनी दर्जेदार बेदाण्याचीनिर्मिती केली आहे. बाजारात चांगला दर मिळत आहे. 

उजाड माळरानावर उभारल्या द्राक्षबागा 

तालुक्यामध्ये उजाड माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. बिळूर, उमदी, सिद्धनाथ, तिकोंडी, डफळापूर, भिवर्गी, जालिहाळ खुर्द करजगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी, बेलोंडगी, जालिहाल बुद्रुक, मचंडी, कोंतवबोबलाद आदी भागात द्राक्षेबागांचे प्रमाण अधिक आहे.

बेदाण्याची वैशिष्ट्ये

• सुटखाणे आकार
• हिरव्या रंगाचा आर्कषक बेदाणा
• माणिक चमन वाणाची द्राक्षे
• साखरेचे प्रमाण अधिक
• दोन सेंटिमीटरपेक्षा जास्त लांबी

हेही वाचा : हवामान बदल आणि शेती पुढील आव्हाने; जाणून घ्या यावरील शाश्वत उपाय

Web Title : पश्चिमी महाराष्ट्र में अंगूर की कीमतों में गिरावट के बीच किशमिश उत्पादन में उछाल।

Web Summary : सांगली में अंगूर की फसल खत्म होने वाली है। प्रतिकूल मौसम से उपज प्रभावित हुई, लेकिन बेहतर कीमतों के कारण किशमिश उत्पादन में वृद्धि हुई। महंगी लागत जैसी चुनौतियों के बावजूद, किसान प्रौद्योगिकी और अनुकूल शुष्क जलवायु का लाभ उठाकर उच्च गुणवत्ता वाली किशमिश का उत्पादन कर रहे हैं। किशमिश में आकार और मिठास जैसी अनूठी विशेषताएं हैं।

Web Title : Raisin production booms in Western Maharashtra amid grape price slump.

Web Summary : Sangli's grape harvest nears completion. Unfavorable weather affected yields, but raisin production surged due to better prices. Despite challenges like costly inputs, farmers are producing high-quality raisins, leveraging technology and favorable dry climate. Raisins boast unique characteristics like size and sweetness.