पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांना फटका बसला आहे.
यामध्ये सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, हरभरा, कांदा, आंबा, तसेच फळपिकांचा समावेश आहे.
या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागाचे संयुक्त पथक प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल करणार असल्याची माहिती विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी यांनी दिली.
राज्यात गेल्या चार दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर गारपीटही झाली आहे.
रब्बी हंगामातील महत्त्वाच्या गहू, हरभराच्या पिकांची काढणीची कामे सुरू असतानाच या अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांचा हाती आलेला घास हिसकावून नेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
जमीनदोस्त झालेली पिके प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, मका, केळी, आंबा, ज्वारी, कलिंगड, खरबूज, ऊस, पपई, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्रा, भाजीपाला, भुईमूग या पिकांचा समावेश आहे.
नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड, धाराशिव, यवतमाळ, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर व संभाजीनगर यांचा समावेश आहे.
सर्वाधिक ३ हजार ५५८ हेक्टर पिकांचे नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात झाले आहे. तर संभाजीनगर जिल्ह्यात ९९१ हेक्टरचे नुकसान झाले.
पिके नष्टकृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १४ ते १८ मार्च या कालावधीत राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवकाळी पाऊस झाला असून, यातून ३० तालुक्यांमधील ६ हजार ९१३ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत.
जिल्हा - नुकसान (हे.)पुणे - ८४४.७०कोल्हापूर - ०.१०नागपूर - ४१.१७चंद्रपूर - १०.६०लातूर - ५२नांदेड - ८४.२५धाराशिव - १,०१४यवतमाळ - १४०.९०सोलापूर - १७६.६०अहिल्यानगर - ३,५५८.५०संभाजीनगर - ९११एकूण - ६,९१३.८२
अधिक वाचा: शेतजमिनीच्या पोटहिश्शाची मोफत मोजणी होणार; आता दहा गुंठ्यांचाही नकाशा मिळणार
Web Summary : Untimely rains and hailstorms in Maharashtra have severely impacted 11 districts, damaging approximately 7,000 hectares of crops including wheat, chickpea, and fruits. A joint agriculture and revenue department team will assess the losses, with Ahilyanagar district reporting the highest damage.
Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश और ओलावृष्टि से 11 जिलों में भारी नुकसान हुआ है, जिसमें लगभग 7,000 हेक्टेयर फसलें बर्बाद हो गई हैं, जिनमें गेहूं, चना और फल शामिल हैं। कृषि और राजस्व विभाग की एक संयुक्त टीम नुकसान का आकलन करेगी, अहिल्यानगर जिले में सबसे अधिक नुकसान हुआ है।