पुणे: राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली.
बीड, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांना एकट्या सप्टेंबर महिन्यात मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे क्षेत्र वाढत आहे.
सप्टेंबर महिन्यात तब्बल २६ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यात बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत प्रत्येकी पावणेसहा लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. त्या खालोखाल जालना आणि सोलापूर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
हे अंदाजित नुकसान २७ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे झाले असल्याचे कृषी विभागाने सांगितले. परिणामी, आता संपूर्ण खरिपात नुकसान झालेले क्षेत्र तब्बल ५२ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
अतिवृष्टी, महापूर आणि नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज होत आहे. असून खरडून गेलेली शेती, दयनीय अवस्था झालेले शेतकरी, सर्वस्व गमावलेले लोक यांना कोणता दिलासा देणार याकडे डोळे लागले आहेत.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकष बाजूला ठेवून वाळीव मदत देण्याची भूमिका जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
यंदाचे शेतीचे नुकसान (हेक्टरमध्ये)
जून - १.३४ लाख
जुलै - १.४४ लाख
ऑगस्ट - २४.४४ लाख
सप्टेंबर - २६ लाख
एकट्या सप्टेंबरमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?
जिल्हा क्षेत्र (हेक्टर)
जळगाव - ११,४६४
बुलढाणा - ६४,६८२
अमरावती - २,६७३
नागपूर - १,०१६
नाशिक - १४,०३५
ठाणे - ५
छ. संभाजीनगर - १,६६,२२६
वर्धा - २२,९६०
अहिल्यानगर - ५,७८,७९८
बीड - ५,७१,१००
यवतमाळ - १,३७,५६८
चंद्रपूर - ३,६३०
रायगड - २४
सातारा - ३२०
सोलापूर - ३,५१,४३७
हिंगोली - ९,५००
वाशिम - ३८,५४१
पुणे - २७३
जालना - ३,७५,९७३
रत्नागिरी - ६२
सांगली - ३,५३५
लातूर - ८,८०५
परभणी - ५६,८३६
धाराशिव - १,८१,२००
एकूण - २६,००,६५८
अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?