मोहोळ : सन २०२३-२०२४ खरीप हंगामामध्ये जास्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान म्हणून मतदारसंघातील सर्व बाधित शेतकऱ्यांना ५९ कोटी १९ लाखांचा पीकविमा मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार यशवंत माने यांनी दिली.
मोहोळ भागातील २०२३-२०२४ खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मतदारसंघातील बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरला होता. ती भरपाई मिळावी म्हणून शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत होते.
या बाधित शेतकऱ्यांना विमा मिळावा म्हणून माजी आमदार यशवंत माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर सर्व बाधित शेतकऱ्यांना ५९ कोटी १९ लाखांचा पीकविमा मंजूर झाला.
येथील शेतकऱ्यांना विमा
- मोहोळ तालुक्यासाठी ८,८५६ शेतकऱ्यांना २२.०९ कोटी
- उत्तर सोलापूर (संपूर्ण) तालुक्यातील १२,५१९ शेतकऱ्यांना ३४.८१ कोटी
- पंढरपूर (संपूर्ण) तालुक्यातील ९५१ शेतकऱ्यांना २.२९ कोटी
रुपयाचा विमा मंजूर करण्यात आला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.
अधिक वाचा: राज्य सरकारने रेशनवरील धान्य वेळेत वाटपासाठी घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर