Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर

Control room at commissionerate level to resolve farmers' problems; Contact on this toll free number | शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. Contact Toll Free for Farmers

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. Contact Toll Free for Farmers

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५ उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४००० क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

संबंधितांनी व्हॉट्सॲप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा.

अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.

ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

अधिक वाचा: Maha Us Nondani ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरा नाहीतर गाळपाची परवानगी विसरा

Web Title: Control room at commissionerate level to resolve farmers' problems; Contact on this toll free number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.