Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेच्या निकषांत झाले बदल; जाणून घ्या सविस्तर

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेच्या निकषांत झाले बदल; जाणून घ्या सविस्तर

Changes in criteria for study tour scheme for farmers in the state outside the country; Know the details | राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेच्या निकषांत झाले बदल; जाणून घ्या सविस्तर

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनेच्या निकषांत झाले बदल; जाणून घ्या सविस्तर

Farmer Foreign Tour Scheme राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येते.

Farmer Foreign Tour Scheme राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येते.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येते.

सन २०२४-२५ मध्ये या योजनेत शेतकरी निवडीचे निकषांमध्ये शेतकरी किमान बारावी पास असावा व वयोमर्यादा वय वर्षे २५ ते ६० असावी हे प्रमुख निकष होते.

मा.आयुक्त कृषी यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती बैठकीमध्ये या निकषांत बदल करण्यात आले असून किमान शिक्षणाची अट व कमाल वय साठ वर्षे हि अट रद्द करण्यात आली आहे.

महिलांचेशेतीतील अमूल्य योगदान लक्षात घेता सन २०२५-२६ या वर्षात महिला शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळावी या उद्देशाने या योजनेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

सदर योजनेत सन २०२४-२५ मध्ये युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व थायलंड या देशांची परदेश अभ्यास दौऱ्याकरिता निवड करण्यात आली होती.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरिया या देशांचा समवेश करण्यात आलेला आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी निवडीचे निकष, सन २०२५-२६ करिता दौरा देश या बाबींमध्ये बदल केल्यामुळे सन २०२४-२५ मध्ये करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात येत आहे.

तथापि ज्या शेतकऱ्यांची पूर्वी निवड झालेली होती ते नव्याने अर्ज करू शकतात व पात्रतेनुसार त्यांचाही विचार या योजनेंतर्गत केला जाईल.

अधिक वाचा: विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Web Title: Changes in criteria for study tour scheme for farmers in the state outside the country; Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.