Lokmat Agro >शेतशिवार > केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर

Central government increases FRP; But how much will this benefit farmers? Know in detail | केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर

Sugarcane FRP 2024-25 केंद्र सरकार एफआरपीत दरवर्षीच वाढ करीत असले तरी तोडणी वाहतूक त्याहीपेक्षा अधिक वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पडणाऱ्या रकमेत वाढ होताना दिसत नाही.

Sugarcane FRP 2024-25 केंद्र सरकार एफआरपीत दरवर्षीच वाढ करीत असले तरी तोडणी वाहतूक त्याहीपेक्षा अधिक वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पडणाऱ्या रकमेत वाढ होताना दिसत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : केंद्र सरकार एफआरपीत दरवर्षीच वाढ करीत असले तरी तोडणी वाहतूक त्याहीपेक्षा अधिक वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पडणाऱ्या रकमेत वाढ होताना दिसत नाही.

तोडणी वाहतूक प्रति टन सर्वाधिक १०७६ रुपयांवर गेली असून एफआरपी कमीत कमी २०९७ रुपयांवर आली आहे. एफआरपी वाढीमुळे ऊस उत्पादकांना लई पैसे मिळतात असे दिसत असले तरी तो भ्रम ठरत आहे.

केंद्र सरकारऊस उत्पादकांसाठी एफआरपी दरवर्षी वाढ करते. त्याचा फायदा साहजिकच शेतकऱ्यांना मिळायला हवा. मात्र, तसे होत नाही. तोडणी-वाहतूक त्याच पटीत वाढ केली जाते.

केंद्र सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे पडलेल्या साखर उताऱ्यावर एफआरपी निश्चित होते. आलेल्या एफआरपीतून तोडणी वाहतूक वजा करून ऊस उत्पादकांना द्यावयाची रक्कम निश्चित केली जाते.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांपर्यतच आहे. श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, इंद्रेश्वर शुगर अशा बोटावर मोजण्याइतक्या साखर कारखान्यांचा साखर उतारा ११ टक्क्यांपर्यत आहे.

उर्वरित साखर कारखान्यांचा साखर उतारा आठ ते १० टक्क्यांपर्यंत येत असल्याने एफआरपी कमीच बसते. एफआरपी कमी अन् तोडणी वाहतूक अधिक असे चित्र सध्या दिसत आहे.

तोडणी-वाहतूक १०७६ रुपयांवर
सिद्धनाथ शुगर तिर्हे : १,०७५ रुपये ५५ पैसे.
व्ही. पी. शुगर : १,०५४ रुपये.
इंद्रेश्वर शुगर : १,०३५ रुपये.
भैरवनाथ आलेगाव : १,०३३ रुपये.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे : १०२० रुपये.
आष्टी शुगरची : १,००६ रुपये.
श्री संत दामाजी कारखाना : ७७८ रुपये.
विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर : ८७१ रुपये.
जकरायाची : ८७७ रुपये.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याची सर्वाधिक रक्कम
◼️ विठ्ठलराव शिंदे करकंबची शेतकऱ्यांना द्यावयाची सर्वाधिक रक्कम २७९२ रुपये, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेरची २७७९ रुपये श्री. पांडुरंग श्रीपूरची शेतकऱ्यांना द्यावयाची रक्कम २७७३ रुपये, तर इंद्रेश्वर शुगरची २६३४ रुपये इतकी आहे.
◼️ व्ही.पी. शुगरची शेतकऱ्यांना द्यावयाची सर्वांत कमी रक्कम (एफआरपी) २०९७ रुपये, भैरवनाथ आलेगावची रक्कम २११८ रुपये, भैरवनाथ लवंगी २१५२ रुपये, आवताडे शुगरची २१५४ रुपये, धाराशिव सांगोल्याची २१९० रुपये, मातोश्री लक्ष्मी शुगर २१५६ रुपये, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याने शेतकऱ्यांना द्यावयाची रक्कम २१३१ रुपये इतकी आहे.

अधिक वाचा: मान्सून निकोबार बेटांवर आला; महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Central government increases FRP; But how much will this benefit farmers? Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.