Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > वराहांची होणार रक्त तपासणी; 'क्लासिक स्वाइन फिव्हर' नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने घेतला निर्णय

वराहांची होणार रक्त तपासणी; 'क्लासिक स्वाइन फिव्हर' नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने घेतला निर्णय

Blood tests of boars will be conducted; Animal Husbandry Department has taken a decision to control 'Classic Swine Fever' | वराहांची होणार रक्त तपासणी; 'क्लासिक स्वाइन फिव्हर' नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने घेतला निर्णय

वराहांची होणार रक्त तपासणी; 'क्लासिक स्वाइन फिव्हर' नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने घेतला निर्णय

पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत तीन ते १५ महिने वयोगटातील वराहांचे (डुक्कर) लसीकरणपूर्व रक्तजल नमुने संकलित केले जात आहेत.

पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत तीन ते १५ महिने वयोगटातील वराहांचे (डुक्कर) लसीकरणपूर्व रक्तजल नमुने संकलित केले जात आहेत.

पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तीन ते १५ महिने वयोगटातील वराहांचे (डुक्कर) लसीकरणपूर्व रक्तजल नमुने संकलित केले जात आहेत.

वराहांमध्ये आढळणाऱ्या 'क्लासिक स्वाइन फिव्हर' या घातक आजाराचे नियंत्रण करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र लसीकरणापूर्वी वराहांच्या शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती किती आहे किंवा यापूर्वी संसर्ग झाला होता का, याची तपासणी करण्यासाठी रक्तजल नमुने गोळा केले जात आहेत.

संकलित नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हा किंवा राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवले जाणार असून त्यावर आधारित पुढील लसीकरण मोहिमेची दिशा ठरवली  जाणार आहे.

शहादा तालुक्यातील प्रत्येक गावातील वराह पालकांशी संपर्क साधून निवडक ३ ते १५ महिने वयोगटातील वराहांचे नमुने घेतले जात आहेत. या मोहिमेसाठी पशुवैद्यकीय कर्मचारी सक्रियपणे कार्यरत असून पशुपालकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

३ ते १५ महिन्यांच्या वराहांची तपासणी

नंदुरबार जिल्ह्यातील तीन ते १५ महिने वयोगटातील वराहांचे (डुक्कर) लसीकरणपूर्व रक्तजल नमुने संकलित केले जात असल्याचे संबंधित विभागाने सांगितले.

रोग नियंत्रणासाठी वैज्ञानिक पद्धतीवर भर

• 'क्लासिक स्वाइन फिव्हर' सारख्या संसर्गजन्य रोगांमुळे वराहपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे केवळ लसीकरणावर भर न देता, लसीकरणपूर्व तपासणीद्वारे रोगप्रतिकारशक्ती आणि संसर्गाची पूर्वस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

• या वैज्ञानिक पद्धतीमुळे भविष्यात अधिक प्रभावी आणि लक्ष्यित लसीकरण शक्य होणार आहे. दरम्यान, संकलित नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हा किंवा राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवले जाणार असून त्यावर आधारित पुढील लसीकरण मोहिमेची दिशा ठरणार आहे

गावागावात नमुना संकलनाची मोहीम

• नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी वराहपालकांशी थेट संपर्क साधत आहेत. योग्य वयोगटातील वराहांची निवड करून रक्तजल नमुने घेतले जात आहेत.

• संकलनानंतर हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली जाणार असून, त्यानुसार पुढील आरोग्य योजना आखली जाणार आहे.

• या प्रक्रियेमुळे आजाराचा प्रादुर्भाव वेळेत ओळखून नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.

• दरम्यान, या मोहिमेसाठी पशुवैद्यकीय कर्मचारी सक्रियपणे कार्यरत असून पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

वेळेत तपासणी आणि अचूक लसीकरणामुळे वराहपालकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता या नमुना संकलन मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे. - सुनील गोस्वामी, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी, शहादा जि. नंदुरबार.

हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर 

Web Title : स्वाइन फीवर नियंत्रण के लिए सुअरों के रक्त परीक्षण शुरू

Web Summary : 'क्लासिक स्वाइन फीवर' को नियंत्रित करने के लिए, नंदुरबार का पशुपालन विभाग 3-15 महीने की आयु के सुअरों से टीकाकरण-पूर्व परीक्षण के लिए रक्त के नमूने एकत्र कर रहा है। इससे रोग प्रतिरोधक क्षमता के स्तर का निर्धारण करने और टीकाकरण प्रयासों को अनुकूलित करने में मदद मिलती है, जिससे समय पर रोग नियंत्रण के माध्यम से सुअर किसानों को आर्थिक नुकसान से बचाया जा सकता है।

Web Title : Pig Blood Tests for Swine Fever Control Initiated

Web Summary : To control 'Classical Swine Fever,' Nandurbar's animal husbandry department is collecting blood samples from pigs aged 3-15 months for pre-vaccination testing. This helps determine immunity levels and tailor vaccination efforts, protecting pig farmers from economic losses through timely disease control.