शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची दमदार आवक सुरू असून, सध्या दररोज नऊ ते दहा हजार कट्टे तुरीची आवक होत आहे. यामध्ये सरासरी ६,८०० पासून ९,१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
यासोबतच पांढऱ्या तुरीचे ७ हजार कट्टे आवक असून, या तुरीला ६,८५०-७३०० ते ७१०० असा दर मिळत आहे. तांबड्या तुरीचे ३ हजार कट्टे आवक असून, ६,८०० -७,०२५ ते ७,००० दर मिळत आहे.
काळ्या तुरीला सर्वाधिक दर मिळत असून, १ हजार कट्टे आवक असलेल्या या तुरीला ८,८००-९,१०० ते ८,९०० असा दर मिळत आहे.
या आठवड्यात तुरीचे दर काहीसे कमी झाले असून, ७,५०० रुपये क्विंटल असणारी पांढरी तूर ७,३०० पर्यंत आली आहे. तर काळी तूरदेखील ९,५०० वरून ९,१०० वर आली आहे.
आयात धोरणामुळे तुरीच्या दरात घट
◼️ दरवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे केवळ ७० टक्के एवढेच उत्पन्न आहे.
◼️ गतवर्षी तुरीला सरासरी आठ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत होता.
◼️ मात्र, इम्पोर्टेड तुरीमुळे यंदा भावात काहीशी घट झाली आहे.
◼️ सरकारला इम्पोर्टेड तुरीला ५,००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटर दर मिळत आहे.
◼️ तसेच इम्पोर्टेड तूरडाळीचा दरही ८० रुपये किलो आहे.
◼️ तर भारतीय तुरीपासून तयार झालेल्या डाळीचा दर हा १०० ते ११० रुपये प्रतिकिलो आहे.
◼️ यासोबतच जुनी डाळही २५ रुपये किलोने मिळत असल्याने यंदा तुरीच्या दरावर त्याचा थोडासा परिणाम झाल्याचे बाबा डाळ समूहाचे प्रमुख मैनुद्दीन तांबोळी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 'हा' कारखाना देणार उसाला सरसकट १०० रुपये अनुदान
