Lokmat Agro >शेतशिवार > चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर

चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर

Bitter in taste but sweet to health, these are the numerous benefits of fenugreek seeds; Know in detail | चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर

चवीला कडू पण आरोग्याला गोड, मेथीच्या दाण्यांचे 'हे' असंख्य फायदे; जाणून घ्या सविस्तर

methi आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे मेथीचे दाणे चवीला कडू असले तरी त्यांचे आरोग्यावरचे गोड फायदे अमूल्य आहेत.

methi आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे मेथीचे दाणे चवीला कडू असले तरी त्यांचे आरोग्यावरचे गोड फायदे अमूल्य आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे मेथीचे दाणे चवीला कडू असले तरी त्यांचे आरोग्यावरचे गोड फायदे अमूल्य आहेत.

पिठं भिजवताना किंवा खास पदार्थांमध्ये वापरले जाणारे हे छोटे दाणे शरीराला पोषण देतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतात.

प्रथिने, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम तसेच जीवनसत्त्व ए, सी, के आणि फॉलिक अ‍ॅसिड यांचे भरपूर प्रमाण मेथीत आढळते. यामुळे शरीराची ताकद वाढते आणि आवश्यक पोषण मिळते.

मेथीचे आरोग्यास होणारे फायदे
◼️ पचनाच्या दृष्टीने मेथी विशेष उपयुक्त ठरते.
◼️ अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पित्ताचा त्रास कमी करण्यास मदत होते.
◼️ मधुमेह असणाऱ्यांसाठी तर मेथी दाणे आहाराचा अविभाज्य भाग मानले जातात कारण ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.
◼️ लोह आणि कॅल्शियममुळे रक्ताची निर्मिती आणि हाडे मजबूत राहतात.
◼️ मेथीचे भिजवलेले दाणे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
◼️ सौंदर्याच्या दृष्टीनेही मेथी अमृतासमान आहे.
◼️ मेथीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स, डाग, पुरळ कमी होतात व त्वचा तजेलदार दिसते.
◼️ अँटीऑक्सिडंट्स त्वचेचं नुकसान टाळतात आणि सुरकुत्या कमी करतात.
◼️ केसांसाठीही मेथी फायदेशीर असून मुळे मजबूत होतात, कोंडा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.
◼️ महिलांच्या आरोग्यासाठी मेथी विशेषतः महत्त्वाची आहे.
◼️ मासिक पाळीतील वेदना कमी होतात तसेच हार्मोनल समतोल राखण्यास मदत होते.
◼️ एकंदरीत, मेथीचे दाणे हे केवळ मसाल्यापुरते मर्यादित नसून आरोग्य, सौंदर्य आणि पोषणाचा अनमोल नैसर्गिक स्रोत आहेत.
◼️ नियमित व मर्यादित वापर शरीराला निरोगी ठेवतो आणि जीवन अधिक उत्साही बनवतो.
◼️ मेथीचे दाणे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त मानले जातात.
◼️ हिवाळ्यात मेथीचे सेवन केल्यास सर्दी, खोकला व ताप कमी होण्यास मदत होते.
◼️ सांधेदुखी किंवा स्नायू वेदनांमध्ये मेथीचे सेवन आराम देते.
◼️ कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदय निरोगी ठेवण्यासही मेथी मदत करते.

अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Bitter in taste but sweet to health, these are the numerous benefits of fenugreek seeds; Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.