Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग

Big change in Chief Minister Baliraja's Shet Panand Road Scheme; Now the work on farm roads will get speed | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग

shet raste yojana update राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

shet raste yojana update राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, आता शेतरस्ते तयार करण्यासाठी १०० टक्के यंत्रसामग्रीचा वापर करता येणार आहे.

सध्या मनरेगाअंतर्गत रस्ते तयार करताना अनेक जाचक अटी होत्या, तसेच मजुरांच्या उपलब्धतेअभावी कामे रखडत होती.

मात्र, आता शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन नवीन योजनेत यंत्राच्या साहाय्याने रस्ते तयार केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहेत.

या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, २५ कि.मी. लांबीचे क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रियेद्वारे ही कामे जलदगतीने पूर्ण केली जातील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

योजनेची वैशिष्ट्ये
१) अतिक्रमण हटवणार

गाव नकाशावरील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवली जातील.
२) शुल्कात माफी
रस्त्यासाठी लागणारी मोजणी आणि पोलिस बंदोबस्ताचे शुल्क शासनाने पूर्णपणे माफ केले आहे.
३) रॉयल्टी नाही
रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी लागणारे गाळ, माती, मुरूम किंवा दगडासाठी कोणतीही रॉयल्टी लागणार नाही.
४) वृक्षारोपण अनिवार्य
रस्त्याच्च्या दोन्ही बाजूंना 'बिहार पॅटर्न' किंवा मनरेगामधून वृक्षारोपण करणे बंधनकारक असेल.

अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर? कुणी दिला किती दर? वाचा सविस्तर

Web Title : बळीराजा खेत सड़क योजना में बड़ा बदलाव: सड़क कार्यों में आएगी तेजी

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने बळीराजा खेत सड़क योजना को मंजूरी दी, जिससे 100% मशीनरी का उपयोग संभव होगा। श्रम की कमी जैसी बाधाएं दूर हुईं। किसानों को परिवहन के लिए हर मौसम में सड़कें मिलेंगी। फंड आवंटित; 25 किमी के क्लस्टर तेजी से पूरे किए जाएंगे। अतिक्रमण हटाए गए; शुल्क माफ; वनीकरण अनिवार्य।

Web Title : Major Changes in Baliraja Farm Road Scheme: Road Works to Speed Up

Web Summary : Maharashtra government approves Baliraja Farm Road Scheme, enabling 100% machinery use. Obstacles like labor shortages are overcome. Farmers gain all-weather roads for transport. Funds allocated; 25 km clusters will be tendered for rapid completion. Encroachments removed; fees waived; afforestation compulsory.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.