Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट?

बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट?

Bidri Sugar Factory has deposited the sugarcane bill till December 15; At what rate was the payment made? | बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट?

बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट?

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांनी चालू गळीत हंगामात दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे बिल जमा केले आहे.

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांनी चालू गळीत हंगामात दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे बिल जमा केले आहे.

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांनी चालू गळीत हंगामात दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे बिल जमा केले आहे.

उसासाठी प्रतिटन ३६१४ रुपये या दराने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ही माहिती अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.

या दुसऱ्या पंधरवड्यात कारखान्याकडून १ लाख ३२ हजार ८४६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याबदल्यात देय असलेली संपूर्ण ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

याशिवाय, दि. १ ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यातील ऊस तोडणी व वाहतूक खर्चाची बिलेही पूर्णतः अदा केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.

गळीत चालू हंगामासाठी कारखान्याने १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे असे सांगण्यात आले आहे.

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकवलेला ऊस बिद्री साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी यावेळी केले.

अधिक वाचा: देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेला 'हा' साखर कारखाना राज्यातही ठरला सर्वोत्तम

Web Title : बिद्री चीनी मिल ने गन्ना बिल का भुगतान किया; ₹3614 प्रति टन चुकाए

Web Summary : बिद्री चीनी मिल ने 15 दिसंबर तक गन्ना भुगतान जमा किया, किसानों के खातों में ₹3614 प्रति टन का भुगतान किया गया। मिल ने 1,32,846 मेट्रिक टन गन्ने की पेराई की। गन्ना कटाई और परिवहन का भुगतान भी किया गया, अध्यक्ष के. पी. पाटिल ने कहा। मिल का लक्ष्य इस सीजन में 10 लाख मेट्रिक टन पेराई करना है।

Web Title : Bidri Sugar Factory Clears Sugarcane Bills; Paid ₹3614 Per Ton

Web Summary : Bidri Sugar Factory deposited sugarcane payments up to December 15th, paying ₹3614 per ton directly to farmers' accounts. The factory crushed 1,32,846 metric tons of sugarcane. Payments for sugarcane harvesting and transportation have also been cleared, says Chairman K. P. Patil. The factory targets crushing 10 lakh metric tons this season.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.