Lokmat Agro >शेतशिवार > भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाणार

भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाणार

Bharat Ratna Dr. M.S. Swaminathan's birthday to be celebrated as 'Sustainable Agriculture Day' in the state | भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाणार

भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाणार

ms swaminathan भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला.

ms swaminathan भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला.

शेअर :

Join us
Join usNext

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने त्यांचा जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी ‘’शाश्वत शेती दिन’ shashwat sheti din म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला.

त्यांच्या महान कार्य, योगदान, समर्पण आणि नम्रतेसाठी भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये ‘भारतरत्न’ नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

तसेच, संयुक्त राष्ट्रांनी त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक असे गौरवले आहे. ‘शाश्वत शेती दिनानिमित्त’ राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ‘डॉ. एम एस स्वामीनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ स्थापन करण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, महिला शेतकरी इ. बाबीतील विशेष कार्य विचारात घेऊन त्यानुंषगाने ‘शाश्वत शेती दिन’ राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर, विद्यापीठस्तरावर साजरा करणे, त्यांच्या नावे पुरस्कार देणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कृषी आयुक्त कार्यालयाला या दिवसाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे असे कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले.

अधिक वाचा: शेतकऱ्यांचे बांधावरील वाद आता निकाली निघणार; सातबाऱ्यावरील पोटहिश्श्यासाठी 'हा' महत्वाचा निर्णय

Web Title: Bharat Ratna Dr. M.S. Swaminathan's birthday to be celebrated as 'Sustainable Agriculture Day' in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.