lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील रेशीम उत्पादनापैकी सर्वाधिक वाटा बीड जिल्ह्याचा

राज्यातील रेशीम उत्पादनापैकी सर्वाधिक वाटा बीड जिल्ह्याचा

Beed district accounts for the largest share of silk production in the state | राज्यातील रेशीम उत्पादनापैकी सर्वाधिक वाटा बीड जिल्ह्याचा

राज्यातील रेशीम उत्पादनापैकी सर्वाधिक वाटा बीड जिल्ह्याचा

कुलगुरूंनी घेतला आढावा : विदर्भाचे शेतकरी करणार अभ्यास दौरा

कुलगुरूंनी घेतला आढावा : विदर्भाचे शेतकरी करणार अभ्यास दौरा

शेअर :

Join us
Join usNext

रेशीमशेतीला राज्यपातळीवर अव्वल प्राधान्य मिळत आहे. राज्य बाजारपेठेत एकूण उत्पादनापैकी ३० टक्के रेशीम बीड जिल्हा पुरवत आहे. या पार्श्वभूमीवर रेशीमशेतीचा आढावा व माहिती घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी रविवारी गेवराईतील राहेरी व रुई गावाचा दौरा केला आहे.

मराठवाड्यात होत असलेल्या यशस्वी रेशीमशेतीविषयीविदर्भातील शेतकरीदेखील अवगत व्हावे, यासाठी विदर्भ शेतकऱ्यांचा जिल्ह्यात अभ्यास दौरा आयोजित केला जाणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करत असल्याचे गडाख यांनी यावेळी सांगितले.

एक लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २० रुपये अन् दुधाला २५ रुपये भाव ; दूध उत्पादक संकटात

तसेच रेशीम उद्योगासोबतच शेळीपालन, कुक्कुटपालन यापासून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. नर्सरीपासून तुती लागवडीचे फायदे, चाकी संगोपन, प्रौढ कीटक संगोपन, कोष खरेदीची त्यांनी माहिती घेतली आहे. यावेळी विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. उंदीरवाडे, पीक प्रकल्प विभागाचे संचालक डॉ. जे. पी. देशमुख, तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, रेशीम संचालनालयामार्फत उपसंचालक महेंद्र ढवळे, रेशीम अधिकारी एस. बी. वराट यांची उपस्थिती होती.

रेशीम कार्यालय गेवराई तालुका समूहप्रमुख ए. एम. सोनटक्के व तांत्रिक सहायक एस. राठोड, सरपंच गोपीनाथ फलके, सरपंच कालिदास नवले यांच्या हस्ते डॉ. शरद गडाख यांचे स्वागत आले.

Web Title: Beed district accounts for the largest share of silk production in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.