Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात बांबू उद्योग धोरणाला मंजुरी; बांबू उत्पादक शेतकरी व उद्योगाला कसा होणार फायदा?

राज्यात बांबू उद्योग धोरणाला मंजुरी; बांबू उत्पादक शेतकरी व उद्योगाला कसा होणार फायदा?

Bamboo industry policy approved in the state; How will bamboo farmers and industry benefit? | राज्यात बांबू उद्योग धोरणाला मंजुरी; बांबू उत्पादक शेतकरी व उद्योगाला कसा होणार फायदा?

राज्यात बांबू उद्योग धोरणाला मंजुरी; बांबू उत्पादक शेतकरी व उद्योगाला कसा होणार फायदा?

Bamboo Policy Maharashtra 2025 राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Bamboo Policy Maharashtra 2025 राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचे स्थान आणखी बळकट करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी सुसंगत असे हे धोरण असेल. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत हे धोरण राबविले जाईल.

या कालावधीत आणि त्यानंतर पुढील दहा वर्षात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. यातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या पाच लाखांहून अधिक जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

बांबू उत्पादक शेतकरी व उद्योगाला कसा होणार फायदा

  1. या धोरणात बांबू शेतकरी उत्पादक संघटना, कंत्राटी शेती आणि ऊर्जा, उद्योग आणि इतर घरगुती क्षेत्रांमध्ये बांबूच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी पायाभूत सुविधा म्हणून अँकर युनिट्स आणि सामायिक सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.
  2. राज्यभरात १५ बांबू क्लस्टर्स स्थापन करण्यात येतील. याशिवाय दुर्गम भागातील बांबू कारागिरांसाठी सूक्ष्म सामायिक सुविधा केंद्रे सुरु करण्यात येतील. तसेच बांबूच्या संशोधन आणि विकासासाठी कृषी विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाईल.
  3. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी, त्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. यासाठी आवश्यक तेथे आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार केले जातील.
  4. बांबूशी निगडीत प्रक्रिया उद्योगांना व्याज अनुदान, वीज अनुदान तसेच मुद्रांक शुल्क व वीज शुल्क सवलती दिल्या जातील. याशिवाय बांबू क्षेत्रातील नवोन्मेषावर आधारित स्टार्टअप्स आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी व्हेंचर भांडवल निधी म्हणून ३०० कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली.
  5. महाराष्ट्रात आशियायी विकास बँकेच्या सहकार्याने बांबू विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ४ हजार २७१ कोटी रुपयांचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीला दर्जेदार रोपांची निर्मिती, अनुदान व प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
  6. बांबू उत्पादक, उद्योग व वितरक यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच बांबू आधारीत उद्योगांसाठी पीएलआय योजना तयार करून मागणी-पुरवठामधील दरी कमी करून बाजारपेठेचा विकास करण्यात येणार आहे.
  7. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये ५ ते ७ टक्के बांबू बायोमासचा वापर केला जाणार आहे. जीआयस, एमआयस, ब्लॉकचेन, ड्रोन, टिशू कल्चर लॅब्स इत्यादींच्या माध्यमातून बांबू मूल्य साखळीचा विकास करण्यासाठी नवीन तंत्र व संशोधनाला चालना दिली जाणार आहे.
  8. विशेषतः मनरेगातून व सार्वजनिक लागवडीच्या माध्यमातून मोकळ्या जमिनीवर बांबू लागवड करण्यात येणार आहे.
  9. महाराष्ट्र बांबू धोरण २०२५-३० राबविण्यासाठी १ हजार ५३४ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी देण्यात आली. तर २० वर्षांच्या कालावधीसाठी ११ हजार ७९७ कोटी रुपयांच्या तरतुदीस तसेच चालू आर्थिक वर्षात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी  उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यात बांबूला लागवड व उद्योगाला वाव
◼️ जगात बांबूची बाजारपेठ २०३० पर्यंत ८८.४३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होणार आहे. सध्या भारताची बांबू निर्यात २.३ टक्के इतकी आहे.
◼️ भारतातील बांबू उद्योग २८ हजार कोटींचा आणि बांबूचे वन क्षेत्र ४ टक्के इतके आहे. देशाची दरवर्षीची बांबू उत्पादन क्षमता ३२ लाख ३ हजार टन इतकी आहे.
◼️ महाराष्ट्रात बांबू लागवडीखालील क्षेत्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच १.३५ दशलक्ष हेक्टर आहे. महाराष्ट्राचे २०२२ मधील बांबू उत्पादन ९ लाख ४७ हजार टन होते.
◼️ सध्या अमरावती, सिंधुदुर्ग आणि भंडारा जिल्ह्यात उत्पादनाच्या दृष्टीने बांबू क्लस्टर्स आहेत.
◼️ महाराष्ट्रात लागवडीयोग्य पडीक जमीन आणि पडीक जमीन लक्षात घेता, बांबू उत्पादनाची क्षमता दरवर्षी सुमारे १५७.१२ लाख टन होऊ शकते.

अधिक वाचा: तुकडेबंदी कायदा रद्द झाला पण अध्यादेश कधी? कायद्यात सुधारणा करावी लागणार का? वाचा सविस्तर

Web Title : महाराष्ट्र में बांस उद्योग नीति मंजूर: किसानों, व्यवसायों को लाभ

Web Summary : महाराष्ट्र की बांस नीति का उद्देश्य उत्पादन को बढ़ावा देना, रोजगार सृजित करना और निवेश आकर्षित करना है। किसानों को समर्थन, प्रशिक्षण और बुनियादी ढांचे से लाभ होगा। यह नीति प्रोत्साहन और सब्सिडी के साथ विभिन्न क्षेत्रों में बांस के उपयोग को बढ़ावा देती है, जिससे सतत विकास को बढ़ावा मिलता है।

Web Title : Maharashtra Approves Bamboo Industry Policy: Benefits for Farmers, Businesses

Web Summary : Maharashtra's bamboo policy aims to boost production, create jobs, and attract investment. Farmers will benefit from support, training, and infrastructure. The policy promotes bamboo usage across sectors with incentives and subsidies, fostering sustainable growth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.