Awakali Paus : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Awakali Paus) पुन्हा एकदा शेतीच्या नियोजनावर पाणी फेरले आहे. मे महिना शेती मशागतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असताना, या काळात वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प झाले आहे. (Awakali Paus)
नांगरणी, खत टाकणे, बांधबंदिस्त यांसारखी पूर्वतयारी होण्याआधीच वातावरणाने पलटी घेतल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीवर संकटाचे सावट घोंगावत आहे.(Agricultural Work)
जालना जिल्हात गेल्या चार-पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार अवकाळी पाऊस झाल्याने शेती मशागतीच्या कामांना ब्रेक लागला असून, शेतकऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. (Awakali Paus)
ही परिस्थिती आणखी दहा दिवस कायम राहिल्यास खरीप हंगामात पेरणी कशी करावी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जून महिन्यात पावसाळा सुरु होतो. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होऊन त्यात पाऊस पडल्यास शेतकरी पहिल्याच पावसात खरीप हंगामाची पेरणी करतात. म्हणून खरीप हंगामासाठी मे महिना महत्त्वाचा असतो.
१ मे ते ५ जूनपर्यंत शेतीची नांगरणी, उखरणी, कोळपणी, अंतर्गत दुरुस्ती, शेणखत टाकणे, बांध बंदिस्त करणे आदी कामे करण्याची वेळ असते. मात्र, या मे महिन्यातच अवकाळी पाऊस पडत असल्याचे शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर निघत आहे.
मागील दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अवकाळी पातसानेमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
रब्बी पिकांची नासाडी
शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. यंदा कापूस अद्रक, कांदे, टोमॅटो आदी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे शेती करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत.
मागील वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे अद्यापही काही शेतकऱ्यांच्या शेतात रब्बीची पिके उभी असून, या अवकाळी पावसाने पिकांची नासाडी केली आहे.
शेतकरी हैराण
यंदा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, धरणे, पाझर तलाव, पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उन्हाळी मका, बाजरी, कलिंगड, कांदे आदी पिकांची लागवड केली होती.
जूननंतर जिल्ह्यात होणार मान्सूनच्या पावसाचे आगमन
* यात मार्चपासूनच तापमान वाढल्याने मका, कलिंगड, कांदे, गहू आदी पिकांना फटका बसून उत्पन्नात घट झाली. तर आता झालेल्या अवकाळीने बाजरी, कांदे, उन्हाळी मका पिकाची नासाडी होत आहे.
* मे महिन्यात शेतीची नांगरणी होऊन जमीन तापली तरच जून महिन्यात लागवड झालेल्या पिकांची उगवण क्षमता चांगली असते. यासाठी शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहे. मात्र, दररोज पडणाऱ्या अवकाळीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
सोयाबीन, कपाशीची लागवड वाढणार, तर तुरी कमी होणार
यंदा जिल्हाभरात कापूस पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही. मात्र, यंदा चांगला भाव मिळेल या आशेपोटी जिल्हाभरात सोयाबीन आणि कापूस पिकाची लागवड वाढणार आहे. तर तुरीच्या लागवडीत घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Awakali Paus: अवकाळीचा मराठवाड्यात कहर; पिकांचे नुकसान वाचा सविस्तर