lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > दारणा आणि पालखेडमधून आवर्तन, अनेक गावांचा वीज पुरवठा बंद 

दारणा आणि पालखेडमधून आवर्तन, अनेक गावांचा वीज पुरवठा बंद 

Avartan from Darna and Palkhed, power supply off to many villages | दारणा आणि पालखेडमधून आवर्तन, अनेक गावांचा वीज पुरवठा बंद 

दारणा आणि पालखेडमधून आवर्तन, अनेक गावांचा वीज पुरवठा बंद 

दारणा तसेच पालखेड कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

दारणा तसेच पालखेड कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड, येवला, सिन्नर, दिंडोरी तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी असून येत्या 13 जानेवारीपर्यंत आपल्या गावातील वीज पुरवठा तब्बल 22 तास बंद ठेवण्यात येणार आहे. दारणा तसेच पालखेड कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने पाणी चोरी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर सकाळी सहा ते आठ या वेळेतच वीज पुरवठा सुरु राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे.  

दारणा धरणातून आवर्तन 

दारणा धरणातून गोदावरी उजवा आणि डावा तट कालव्यावरील तसेच दारणा, गोदावरी नदीवरील गावांसाठी सिंचनासाठी 1850 दशलक्ष घनफुट पाण्याचे आवर्तन 9 डिसेंबर पासून सोडण्यात आले आहे. हे आवर्तन शेवटच्या गावांपर्यंत पोहचण्यासाठी 13 जानेवारी पर्यंत या गावांमधील वीज पुरवठा सकाळी 6 ते 8 हा कालावधी वगळून खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये निफाड, येवला, सिन्नर, दिंडोरी या चार तालुक्यातील गावांचा समावेश आहे. त्यानुसार निफाड तालुक्यातील मौजे म्हाळसाकोरे, तामसवाडी, ब्राम्हणवाडा, तारूखेडले, खानगाव, खेडलेझुंगे कोळगाव, नांद्रमध्यमेश्वर, धारणगांव विर, गाजरवाडी, धरणगांव खडक, कानळद, देवगांव, शिरवाडे, वाकद, धानोरा, नांदगाव, दहेगांव, रूई इत्यादी गावांचा समावेश आहे. तर सिन्नर तालुक्यातील मौजे चोंढी, मेंढी, सांगवी, सोमठाणा, दहिवाडी, कोळगाव माळ, पाथरे बु., शहापुर, वारेगाव, कोळगाव थडी, हडेवाडी. येवला तालुक्यातील मौजे महालखेडा, निमगांव मठ, मुखेड, सत्यगांव या गावांच्या कालव्यालगतचे रोहित्र बंद करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

पालखेड धरणातून आवर्तन 

त्याचप्रमाणे पालखेड धरणातून पालखेड डावा कालव्यावरील गावांसाठी सिंचनाचे 999 दशलक्ष घनफुट, बिगर सिंचनासाठी 1 हजार दक्षलक्ष घनफुट तसे एकूण 1999 दशलक्ष पाण्याचे आवार्तन 12 डिसेंबर ते 20 जानेवारी दरम्यान सोडण्यात येत आहे. या कालव्यालगतच्या गावातील वीजपुरवठा 21 तास खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर सकाळी सात वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत सुरळीत राहील. यात दिंडोरी तालुक्यातील मौजे जोपुळ, लोखंडेवाडी, चिंचखेड. तसेच निफाड तालुक्यातील मौजे उंबरखेड, पिंपळगाव ब. आहेरगाव, लोणवाडी, पालखेड मि., कारसूळ, दावचवाडी, देवपूर, पंचकेश्वर, रोळसपिंप्री, उगाव, खेडे, शिवडी, नांदुडर्डी, रानवड, ब्राम्हणगाव, कुंदेवाडी, खडकमाळेगाव, सारोळे, कोटमगाव, वनसगाव, सोनेवाडी खु., रामपुर, नैताळे, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव वीर, डोंगरगाव, विष्णूनगर, हनुमाननगर, विंचूर, विठठलवाडी, सुभाषनगर, कोटमगाव, लासलगाव, मरळगोई खुर्द, मरळगोई बु. गोंदेगाव, शिवापूर, पाचोरा, बु., पाचोरा खु.

येवला तालुक्यातील गावे... 

तर येवला तालुक्यातील मौजे मानोरी बु., देशमाने बुं., मुखेड, सोमठाणे, जळगाव ने., निळखेडे, लौकी, शिरसगाव, वळदगाव, पाटोदा, दहेगाव, ठाणगाव, पिंप्री, मुरमी, आडगाव, धुळगाव, अंतरवेली, धानोरे, नांदुर, बाभुळगाव खु., बाभुळगाव बु., बल्हेगाव, भाटगांव, नगरसूल, धामणगांव, सायगांव व अंदरसुल गावातील वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पाणी चोरी करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Web Title: Avartan from Darna and Palkhed, power supply off to many villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.