सोलापूर : अतिवृष्टीची १४०० शेतकऱ्यांची दोन कोटी, तर बियाणांसाठीची साडेबारा हजार शेतकऱ्यांची साडेपंधरा कोटी, असे एकूण २५ हजार ८१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ कोटी ७० लाख रुपये जमा झाले नाहीत.
दरम्यान, खरडून जमीन वाहून गेलेल्या ९५२ शेतकऱ्यांचे १ कोटी ४७ लाख रुपये अद्याप मंजूर झाले नसल्याचे सांगण्यात आले.
यावरून उत्तर तालुक्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सव्वीस हजारांहून अधिक खात्यावर १९ कोटी रुपये जमा झाले नाहीत. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मे महिन्यापासून नुकसान सुरू झाले.
मे नंतर ऑगस्ट महिन्यात उत्तर तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी झाली. यातील काही मंडळांत सप्टेंबर महिन्यातही अतिवृष्टी झाली होती. यामुळे मे महिन्यात उन्हाळी पिकांचे, तर ऑगस्ट महिन्यात खरीप पिकांचे नुकसान झाले होते.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या पंचनाम्याची नुकसानभरपाई आदेश १२ सप्टेंबर रोजी निघाला. या आदेशाला ८५ दिवस उलटले तरी १, ३८८ शेतकऱ्यांची २ कोटी ७ लाख रुपये रक्कम जमा झाली नाही.
सप्टेंबर महिन्यात झालेला पीक नुकसानभरपाई मंजूर आदेश १८ ऑक्टोबर रोजी निघाला. या आदेशानंतर दोन हेक्टरवरील व तीन हेक्टरपर्यंतचा नुकसानभरपाई आदेश २० ऑक्टोबर रोजी निघाला आहे.
ऑगस्ट महिन्यातील मंजूर रक्कम जमा होईना
◼️ ऑगस्ट महिन्यात १५ हजार ७७० शेतकऱ्यांना १८ कोटी ६० लाख ८८ हजार रुपये मंजूर झाले त्यापैकी ६८८ शेतकऱ्यांचे ९५ लाख रुपये अद्याप जमा झाले नाहीत.
◼️ सप्टेंबर महिन्यात चार हजार २४९ शेतकऱ्यांना पाच कोटी ३५ लाख ५६ हजार रुपये मंजूर असून, त्यातील ३३९ शेतकऱ्यांचे ५४ लाख जमा झाले नाहीत.
◼️ दोन ते तीन हेक्टरपर्यंत सप्टेंबर महिन्यातील आदेशानुसार ३६१ शेतकऱ्यांचे ५९ लाख रुपये खात्यावर जमा झाले नाहीत.
◼️ बियाणे व इतर आनुषंगिकचे १२ हजार ४२४ शेतकऱ्यांचे १५ कोटी ६३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत.
मे महिन्यापासून पावसाने सतत नुकसान होत आहे. दिवाळी गोड करण्याची शासनाची घोषणा होती. शेतकरी चोहोबाजुने अडचणीत आला असताना सहज खात्यावर पैसे जमा होतील, अशी शासनाची भुमिका हवी होती. मात्र निकष लावल्याने तीन महिन्यापासून पैशाची प्रतिक्षा आहे. - विजय साठे, शेतकरी संघटना
अधिक वाचा: डिजिटल सातबाऱ्याला अखेर कायदेशीर मान्यता; आता सर्व कामांसाठी वापरता येणार हा सातबारा
