lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या शेतीमालाचे लिलाव बंद

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या शेतीमालाचे लिलाव बंद

Auction of agricultural produce closed tomorrow at Vinchoor Upabazaar Samiti premises | विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या शेतीमालाचे लिलाव बंद

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या शेतीमालाचे लिलाव बंद

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या   कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव बंद असणार आहेत. जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर ...

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या   कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव बंद असणार आहेत. जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर ...

शेअर :

Join us
Join usNext

विंचूर उपबाजार समिती आवारात उद्या  कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव बंद असणार आहेत. जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना यलाठी चार्जचा निषेध करण्यासाठी निफाड पूर्व भागातील गावे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले असून विंचूर उपबाजार समितीमधील कांदा व भुसार मालाचे लिलाव सोमवारी (दि. 4) रोजी बंद राहणार असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितले आहे.

काय आहे जाहीर सूचना?

 "सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी निफाड पुर्व सकल मराठा समाज समितीने निफाड पुर्व भागातील गावे बंद ठेवून मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे निफाड पुर्व सकल मराठा समाज समितीचे पत्रानुसार विंचूर उप बाजार आवारावरील कांदा व भुसार,  या शेतीमालाचे लिलाव सोमवार दि. ०४/०९/२०२३ रोजी बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. "- सभापती , कृऊबास, लासलगाव, नाशिक 
       

Web Title: Auction of agricultural produce closed tomorrow at Vinchoor Upabazaar Samiti premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.